आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ५१ जणांची पहिली यादी जाहीर करून आघाडीत पहिली बाजी मारली आहे. काँग्रेसने यादी जाहीर करण्यासाठी घटस्थापनेचा मुहूर्त साधला असल्याचे दिसत आहे.
काँग्रेस पक्षाच्या पहिल्या यादीत अशोक चव्हाण, प्रणिती शिंदे, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, विश्वजीत कदम, नितीन राऊत, चंद्रकांत हंडोरे, अमिन पटेल, अमित देशमुख, बसवराज पाटील यांसारख्या नेत्यांचा समावेश आहे.
पाहा काँग्रेस उमेदवारांच्या पहिल्या यादीतील ५१ उमेदवारांची नावे
अक्कलकुवा – के. सी पडवी शहादा – पद्माकर विजय सिंग वळवी नवापूर – शिरीष सुरुपसिंग नाईक रावेर – शिरीष मधुकरराव चौधरी बुलढाणा – वसंतराव हर्षवर्धन सकपाळ मेहकर अनंत सखाराम वानखेडे रिसोड – अमित झनक धमनगाव रेल्वे – विरेंद्र जगताप तिवसा – यशोमती चंद्रकांत ठाकूर आर्वी – अमर काळे देवळी – रणजीत प्रताप कांबळे
सावनेर – सुनील केदार नागपूर उत्तर – नितीन राऊत ब्रम्हपूरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार चिमुर – सतीश मनोहर वारूजकर वरोरा – प्रतिभा धानोरकर यवतमाळ – अनिल बाळासाहेब मांग्रुळकर भोकर – अशोक चव्हाण नांदेड उत्तर – डी. पी. सावंत नायगाव – वसंतराव चव्हाण देगलुर – रावसाहेब जयंतराव अंतापूरकर कळमनुरी – संतोष टारफे थरी – सुरेश वरपुडकर
फुलंब्री – डॉ. कल्याण काळे मालेगाव मध्य – शेख आसिफ शेख राशिद अंबरनाथ – रोहित चंद्रकांत साळवे मिरा भाईंदर – सैय्यद मुझफ्फर हुसैन भांडूप पश्चिम – सुरेश हरिशचंद्र कोपरकर अंधेरी पश्चिम – अशोक जाधव चांदीवली – मोहम्मद आरिफ नसीम खान चेंबूर – चंद्रकांत हंडोरे वांद्रे पूर्व – झिशान सिद्दीकी धारावी – वर्षा गायकवाड सायन कोळीवाडा – गणेश कुमार यादव
मुंबादेवी – अमिन पटेल कुलाबा – अशोक जगताप महाड – माणिक जगताप पुरंदर – संजय जगताप भोर – संग्राम थोपटे पुणे कँँन्टॉन्मेंट – रमेश आनंदराव बागवे संगमनेर – बाळासाहेब थोरात लातूर शहर – अमित देशमुख निलंगा – अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर औसा – बसवराज पाटील तुळजापूर – मधुकरराव देवराम चव्हाण
सोलापूर शहर मध्य – प्रणिती शिंदे सोलापूर दक्षिण – मौलबी सैय्यद कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील करवीर – पी. एन. पाटील सडोलिकर पलूस, कडेगाव – विश्वजित कदम जत – विक्रम बाळासाहेब सावंत
शुक्रवारी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसची बैठक झाली होती. त्यानंतरच काँग्रेसचे उमेदवार ठरले होते. शिवाय शनिवारी कॉंग्रेस राष्ट्रवादीची देखील बैठक झाली होती.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.