ज्यांच्या एका ‘आवाजा’वर हजारो मुठी वळल्या अशा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मनावर अखंड गारुड केले आहे. प्रबोधकरांच्या या ‘बाळा’ने महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात मराठी आणि हिंदुत्ववादाचा ‘भगवा’ सतत फडकवत ठेवला.
फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला.
अनेक नेते येतात आणि जातात. निवडणूक, प्रचार, पद, पैसा आणि शेवटी एखादा पुतळा एवढ्यावरच बहुतेक राजकारण्यांचे राजकारण संपून जाते. पण लोकांच्या हितासाठी जिवाच्या आकांताने लढणारा योद्धा मात्र कधीच संपत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब केशव ठाकरे हे असेच योद्धे आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांचे काही विशेष छंद होते. जसे की सिगार, वाईन इ. त्यांच्या बहुतेक फोटो किंवा मुलाखातीमध्ये त्यांच्या हातात पाईप किंवा सिगार असायचे. १९९५ मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांनी पाईपची सवय तर सोडली परंतु सिगारची सवय मृत्यू नंतरच सुटली.
१९९५ ते २००० हा काळ शिवसेना-भाजपसाठी सुवर्णकाळ ठरला. देशात आणि महाराष्ट्रातही सेना-भाजपच्या राजनीतीला जनतेचा अभूतपूर्व कौल मिळाला. महाराष्ट्रात युतीचा भगवा फडकला, आणि बाळासाहेब ठाकरे हे निर्विवाद नेते ठरले..
परंतु त्यानंतर बाळासाहेब जिवंत असताना परत शिवसेना आणी भाजप युति महाराष्ट्रात भगवा फडकवू शकले नाही. त्यानंतर एका सभेत बाळासाहेबांनी शपथ घेतली कि ” जो पर्यंत विधानसभेवर भगवा फडकणार नाही तो पर्यंत हा बाळासाहेब ठाकरे दाढी करणार नाही” त्यानंतर बाळासाहेबांना विवध दाढीच्या स्टाईल मध्ये आपण बघितले आहे.
१७ नोव्हेंबर २०१२ मध्ये बाळासाहेबांचे निधन झाले. माझे हृदय तुमच्यापाशी आहे, असे सांगत बाळासाहेबांनी असंख्य शिवसैनिकांची हृदये काबीज केली.. त्यामुळे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मराठी माणसाच्या हृदयातील स्थान यापुढेही अढळ राहणार आहे..
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.