छोट्या पडद्यावर प्रसारित होणारा शो डान्स दिवानेला आपला विजेता मिळाला आहे. कठीण परिस्थितीवर मात करत हे करून दाखवले आहे विशाल सोनकर यांनी त्याला १५ लाख रुपये बक्षीस स्वरुपात मिळाले आहे.
मुळात विशाल सोनकर हा जमशेदपूर येथील आहे आणि या कार्यक्रमात येण्या मागचे त्याचे कारण होते आईचा इलाज करणे. विशालची आई अर्थराइटिस या रोगाने पिडीत आहे तिच्या इलाजाकरिता त्याने या शो मध्ये भाग घेतला होता.
विशालनि पहिल्याच कार्यक्रमात सांगितले होते कि तो इथे जिंकायला आला आहे. मोठ मोठ्या समीक्षकांना विशालनि आपल्या डान्सने प्रभावित केले आहे. या शो मध्ये नृत्य करणाऱ्या तीन पिढ्यांनी भाग घेतला होता. विशाल दुसऱ्या पिढीतला डान्सर होता. शोच्या सुरवातीला विशाल ला जज शशांक खेतान आणि विशाल यांनी आर्थिक मदत केली होती.
या शो मध्ये समीक्षक माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), निर्देशक शशांक खेतान आणि कॉरियोग्राफर तुषार कालिया हे होते. फायनलच्या दिवशी विशेष समीक्षक म्हणून प्रियंका चोप्रा देखील आल्या होत्या. माधुरी दीक्षित आणि प्रियंका यांनी देवदास मधील ढोला रे ढोला या गाण्यावर नृत्य देखील केले.
जिंकलेल्या बक्षिसात करणार हे काम
विशाल या मिळालेल्या पैश्यात आईचा उपचार करणार आणि जमशेदपूर येथे घर घेणार आहे कारण तो सध्या भाड्याच्या घरात राहतो. जमशेदपूर येथे त्याला डान्स अकेडमी सुरु करायची आहे जिथे मागासलेल्या मुलांना नृत्याचे धडे देता येईल.
या सोबतच विशालच्या नृत्याची प्रशंसा अक्षय कुमार यांनी देखील केली आहे. विशाल ने सांगितले आहे कि डान्स दिवाने नि त्याला बरेच काही शिकवले आहे. सुरवातीला त्याला या कार्यक्रमात थोडा त्रास गेला परंतु नंतर त्याने आपले जोरदार प्रदर्शन केले.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील विशेष माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.