आयर्लंडच्या समुद्र किनाऱ्यावर वेस्ट कॉर्क चार्टड कंपनीचे डेव्ह अडवर्डने एक मासा पकडला आहे. हा मासा साधासुधा मासा नसून कोट्यवधी रुपयांमध्ये विकला जाणारा मासा आहे. विशेष म्हणजे आयरिश मिररनं दिलेल्या माहितीनुसार, यावर्षात सापडलेला हा सर्वात मोठा मासा आहे.
यापूर्वी अशा मोठ्या माशांची अनेकदा चर्चा झालेली आहे. कधी त्याच्या किमतीमुळे तर तर काहींची आकारामुळे. डेव्ह यांनी पकडलेल्या माशाचे वजन जवळजवळ २७० किलो होते. सध्या या माशाचे फोटो व्हायरल झाले आहेत.
वेस्ट कॉर्क चार्टड कंपनीचे डेव्ह अडवर्डला समुद्रात ८.५ फूट लांब ब्लुफिन टुना (Bluefin Tuna) मासा सापडला. टुना मासा हा जपानमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. त्यामुळे त्याला इथे नेहमीच मोठी किंमत मिळते.
डेव्हला हा मासा सापडल्यानंतर त्याने लगेचच हा मासा पाण्यात सोडून दिला. पण हा सोडून दिलेला मासा किती महाग होता याची कोणी कल्पना देखील केली नसेल. या माशाची किंमत वाचून तुम्हालाही धक्का बसेल. या माशाची किंमत आहे तब्बल २३ कोटी रुपये.
होय या माशाला जपानमध्ये ३ मिलियन युरो म्हणजे जवळजवळ २३ कोटीपेक्षा जास्त किंमत आहे. नैसर्गिक पद्धतीने डेव्ह यांनी हा मासा पकडला. त्यानंतर त्यांनी त्याला जहाजात घेऊन त्याचे वजन करून त्याला समुद्रात सोडून दिले.
डेव्ह अडवर्ड आणि त्याची टीम सध्या एका ऍड रिलीज प्रोग्रॅम अंतर्गत १५ ऑक्टोबरपर्यंत १५ वेगवेगळ्या समुद्रांमध्ये फिरणार आहे. याआधी नॉर्वेच्या समुद्रात एक अजब दिसणारा मासा पकडण्यात आला होता, असा फोटो व्हायरल झाला होता. या माशाचे नाव रेअस फिश असे असून त्याचे डोळे फार मोठे होते.
डायनोसॉर सारखा दिसणारा हा मासा १९ वर्षीय ऑस्करनं पकडला होता. याआधी तुम्ही असा मासा कधीच पाहिला नसेल. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.