वादग्रस्त आणि तितकाच पॉप्युलर रिऍलिटी शो बिग बॉसच्या १३ व्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. हा शो सलमान खान होस्ट करतो. यावेळेस शोचे शूटिंग लोकेशन बदलण्यात आले आहे. सीजन १३ च्या बिग बॉसचे शूटिंग मुंबई च्या गोरेगांव फिल्म सिटी मध्ये होणार आहे. या लोकेशन वरून सलमान खानने नाराजी जाहीर केली होती. इथे पोहचायला त्याला जास्त वेळ खर्ची करावा लागणार असल्याचे तो म्हणाला होता.
यापूर्वीच्या शोचे शूटिंग हे लोणावळा मध्ये होत असायचे. दरम्यान मुंबईत यावेळेस खास घर यासाठी बनवण्यात आले आहे. बिग बॉस १३’ मध्ये अभिनेत्री मुग्धा गोडसे, चंकी पांडे, सिद्धार्थ शुक्ला, आदित्य नारायण, मिहिका शर्मा, राजपाल यादव आणि ऋचा भद्रा हे स्पर्धक सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
या शोचे सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान करणार असून शो पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. ‘बिग बॉस १२’ च्या पर्वामध्ये विचित्र जोडी ही थीम ठेवण्यात आली होती. हे पर्व विशेष गाजलेही होते. त्यामुळे यंदाच्या नव्या पर्वाबद्दल प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे.
‘उतरन’ ची रश्मी ठरणार सर्वात महागडी स्पर्धक-
सूत्रांच्या माहितीनुसार या सिजनमध्ये छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई सहभागी होणार आहे. रश्मी देसाई हि ‘उतरन’ या मालिकेतून नावारुपाला आली होती. या मालिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली. या मालिकेमुळे तिचा प्रचंड चाहते वर्ग आहे.
रश्मी या शो मध्ये फक्त सहभागीच होणार नाहीये तर ती सर्वात जास्त मानधन घेणारी स्पर्धक ठरणार असल्याची देखील माहिती आहे. तिला मिळालेल्या लोकप्रियतेमुळेचे तिने बिग बॉसमध्ये सहभागी होण्यासाठी जास्त मानधन स्वीकारलं आहे.
तिने तब्बल १.२ कोटी रुपये मानधन घेतल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे रश्मी कथित प्रियकर अरहान खानसोबत ‘बिग बॉस १३’ मध्ये सहभागी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.