नवरात्र हा निर्मितीचा उत्सव आहे. नऊ दिवस नऊ रंग आणि एकाच रंगाचे कपडे घालणाऱ्या अनेक स्त्रिया आपणास दिसतात. परंतु हि प्रथा कशी सुरु झाली किंवा या मागचे कारण काय आहे याबाबत आपण कधी विचार केला आहे का ? नाही ना परंतु या कुतुहलाचे उत्तर आम्ही आपल्याला देणार आहोत.
छान दिसतो, एकाच रंगांची वस्त्रे परिधान केल्याने सगळ्या महिलांमध्ये एकता दिसते. हे रंग एकमेकींना बांधून ठेवतात. म्हणून एकोपा, समानता यावी यासाठी नऊ दिवस नऊ रंगाची वस्त्रे परिधान करण्याच्या प्रथेला सुरुवात झाली. अश्या गोष्टी ऐकायला बऱ्या वाटतात परंतु या मागचे कारण आपणास माहिती नाही आहे.
प्रत्येकाला आपला फोटो वृत्तपत्रात अथवा प्रसार माध्यमात बघायला आवडतो आणि याच संधीचा फायदा घेत हि प्रथा सुरु झाली असे लक्षात येते. तर २००३ साली महाराष्ट्र टाईम्स म्हणजे मटा हे वृत्तपत्र एवढे काही चांगल्या प्रकारे चालत नव्हते. या उलट लोकसत्ता वृत्तपत्राचा खप जोरदार होता.
त्यांचा लक्षात आले कि लोकसत्ता या वृत्तपत्रास अनेक महिला वाचतात आणि महाराष्ट्र टाईमला जास्त पुरुष पसंती देतात. महिला मध्ये वृत्तपत्राचा खप वाढवायला हा निर्णय घेण्यात आला. २००३ मधे ही कल्पना सुचली. स्त्रियांना टार्गेट करुन तो वाचकवर्ग वाढवायचा. त्यानंतर दिवसानुसार रंग ठरविण्यात आले. ते जास्त आपलेसे, नवरात्रीत समरसणारे म्हणून वाटावे म्हणून दिवसाशी निगडीत देवी घेऊन तिचा रंग त्या दिवसासाठी निश्चित करण्यात आला.
लोकांना या रंगाचे फोटो घातलेले फोटो पाठवायचे आव्हान केले आणि बघता बघता या गोष्टीस तुफान प्रतिसाद मिळू लागला. आता महाराष्ट्र टाईम्स वाले पानपानभर फोटो छापतात या दिवसांत. लोक खास फोटो काढून या पेपरकडे पाठवतात व तो छापून आला का पाहायला दुसऱ्या दिवशी पेपर खरेदी करतात.
आता एवढ्या मोठ्या प्रमाणात या प्रथेने रूप घेतलेले आहे कि पूर्ण मुंबई लोकल विशेष दिवशी विशेष रंगाने भरून दिसणार. ट्रेन, रस्ते, ऑफिस, सगळं एकेका दिवशी एकाएका रंगात दिसतं.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.