राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी हा राजीनामा मंजूर केला आहे. अजित पवारांनी कोणतंही कारण न देता राजीनामा दिला आहे. अजित पवार यांचा राजीनामा मंजूर केल्याचे बागडे यांनी सांगितले.
अजित पवार यांचं नाव शिखर बँक घोटाळा प्रकरणात पुढे आलं होतं. त्यांच्यासह ७० जणांची नावं २५ हजार कोटींच्या घोटाळ्यात समोर आली होती. ज्यामध्ये शरद पवार यांचंही नाव होतं. आज शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार होते.
सकाळपासूनच मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते यावेळी हजर होते. पण यामध्ये अजित पवार हे उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. आजच्या या ईडी नाट्यानंतर अचानक अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडूनही मंजूर करण्यात आला आहे. आज सायंकाळी कार्यालयात येऊन राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राजीनामा मंजूर करण्यासाठी फोन करून सांगितले आणि राजीनामा मंजूर करण्यासाठी सांगितले.
यामुळे दिला असावा राजीनामा-
अजित पवार यांनी यापूर्वी एकदा राजीनामा दिला होता. त्यावेळी देखील शरद पवारांना कल्पना नव्हती. अजित पवार यांच्यावर त्यावेळी सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्यामुळे व्यथित होऊन त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर चौकशीत अजित पवार यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर मंत्री मंडळात वापसी केली होती.
नुकतंच अजित पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे कदाचित नैतिकता म्हणून राजीनामा दिल्याची शक्यता आहे. त्यांनी यापूर्वी नैतिकता म्हणून राजीनामा दिलेला असल्याने यावेळेसहि तसे कारण असण्याची शक्यता आहे.
कौटुंबिक कलह, राष्ट्रवादीत डावलल्याची भावना यासह अनेक चर्चाना अजित दादांच्या राजीनाम्यानंतर उधाण आले आहे. ते ज्यावेळी समोर येऊन याविषयी माहिती देतील तेव्हा याविषयी सविस्तर माहिती समोर येण्याची आता शक्यता आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.