राज्य सहकारी बँकेतील कथित आर्थिक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार यांचे नाव या कथित घोटाळ्यात असून त्यांच्यावर देखील ईडीने गुन्हा दाखल केला आहे.
आज शरद पवार हे स्वतः ईडीच्या कार्यालयात हजर होणार होते. सकाळपासूनच मुंबईत नाट्यमय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते यावेळी हजर होते. पण यामध्ये अजित पवार हे उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. आजच्या या ईडी नाट्यानंतर अचानक अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे.
अजित पवार यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडूनही मंजूर करण्यात आला आहे. आज सायंकाळी कार्यालयात येऊन राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी राजीनामा मंजूर करण्यासाठी फोन करून सांगितले आणि राजीनामा मंजूर करण्यासाठी सांगितले.
विधानसभाध्यक्षांच्या विधिमंडळ कार्यालयात ज्यावेळी अजित पवार आज गेले त्यावेळी हरिभाऊ बागडे तेथे नव्हते. त्यानंतर त्यांच्या पीएच्या हाती राजीनामा सोपवला. तसेच बागडेंना फोन करून याची माहीती दिली. यानंतर बागडेंनी सायंकाळी ५.४० मिनिटांनी हा राजीनामा मंजूर केला. यानंतर त्यांचा मोबाईल बंद आहे.
राष्ट्रवादीच्या कोणत्याही बड्या नेत्यांना हा राजीनामा का दिला याविषयी माहिती नव्हती. स्वतः त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना याविषयी माहिती विचारली असता त्यांनीही याबद्दल काहीच कल्पना नसल्याचे सांगितले आहे.
कुटुंबातील सदस्यांना देखील यामध्ये माहिती नसल्याने चर्चाना उधाण आले आहे. आता अजित पवार हे स्वतः जोपर्यंत समोर येऊन राजीनाम्याचे कारण सांगत तोपर्यंत हा प्रश्न कायम राहणार आहे.
अजित पवार हे राजीनामा देऊन मुंबईवरून पुण्याला निघाल्याचे वृत्त असून त्यांचा मोबाईल बंद आहे. सोबतच त्यांच्या सर्व पीएचे देखील मोबाईल त्यांनी काढून घेतले आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.