लोकसभा निवडणुकीत युवा स्वाभिमानी आघाडीच्या नवनीत कौर राणा यांनी शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव करत संसदेत एन्ट्री मिळवली. नवनीत राणा यांचे पती रवी राणाही विद्यमान आमदार आहेत. नवनीत राणा त्यांचा पराभव करून जायंट किलर ठरल्या आहेत. त्या नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
त्या सध्या नवरात्रौत्सवाच्या तयारीत आहेत. रचना नारी मंचने दांडीयाचे प्रशिक्षण आयोजित केले होते ज्यात त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी महिलांसोबत दांडियाचा आनंद घेतला. त्यांचा मागच्या वर्षी देखील दांडियामध्ये डान्स करतानाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.
जवळपास १५ मिनिटे नवनीत राणा यांनी प्रशिक्षणार्थी महिलांसोबत नृत्यात सहभाग घेतला. अनेक महिलांनाही या दांडिया नृत्यचा आनंद घेतला. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये अमरावती लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा दणदणीत पराभव करणाऱ्या खासदार नवनीत कौर राणा भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.