अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले शहीद कमांडो ज्योती प्रकाश निराला यांच्या बहिणीचा नुकताच विवाह संपन्न झाला. कमांडो ज्योती हे काश्मीर मधील बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. शहीद होण्यापूर्वी त्यांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या दोन दहशतवाद्यांमध्ये लष्कर कमांडर लखवी चा भाचा उबैद उर्फ ओसामा आणि महमूद भाई यांचा समावेश होता.
ज्योती यांनी आपल्या साथीदारांना जीवावर खेळून वाचवले होते. ज्योती निराला यांना चार बहिणी असून त्यांचा ते एकमेव आधार होते. २६ जानेवारी २०१८ रोजी त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते मरणोत्तर अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले होते.
निराला यांच्या बहिणीच्या लग्नात गरुड कमांडोनी पूर्ण केलं भावाचं कर्तव्य-
शहीद निराला यांच्या बहिणीच्या लग्नात त्यांचे मित्र असलेले गरुड कमांडो सामील झाले होते. गावाच्या परंपरेनुसार हात जमिनीवर ठेवून त्यावरून चालत बहिणीला सासरला पाठवण्याची परंपरा देखील पूर्ण करण्यात आली. वायुसेनेच्या या टीममध्ये १०० कमांडो असल्याचे बोलले जात आहे.
बिहारच्या बदिलाडीह मध्ये काही दिवसांपूर्वी निराला यांची बहीण शशिकलाचे लग्न पाली रोडच्या सुजित कुमार यांच्यासोबत झाले. त्यांचे वडील तेजनारायण सिंह यांनी सांगितले कि लग्नाचे हे क्षण त्यांच्यासाठी खूप खास होते. निराला यांचे मित्र असलेल्या या गरुड कमांडोनी त्यांच्या बहिणीच्या लग्नात भावाचे सर्व कर्तव्य पार पाडले.
निराला यांच्या वडिलांनी सांगितले कि लग्नात गरुड कमांडोनी त्यांच्या मुलाची कमी नाही जाणवू दिली. त्यांनी सर्वांचे आभार मानले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.