पावसाचा अंदाज लावण्याला भारतासारख्या शेतीप्रधान देशात वेगळे महत्व आहे. केवळ शेजारीच नाही तर सर्वचजण पावसाकडे डोळे लावून बसलेले असतात. वृत्तपत्र, रेडिओ, न्यूज चॅनेल्सच्या माध्यमातून पावसाचे अंदाज आपल्यापर्यंत पोहोचवले जातात.
पावसाळ्याच्या काळामध्ये याच बातम्यांत किंवा वर्तमानपत्रांमध्ये वाचण्यात येणारा एक शब्द म्हणजे ढगफुटी ! मोठा पाऊस झाला की ढगफुटी झाली असे म्हणले जाते. वरवर ढगफुटी म्हणजे ढगांचे फुटणे असा जरी त्याचा अर्थ निघत असला तरी प्रत्यक्षात ढग वगैरे काही फुटत नाहीत.
ढगफुटी म्हणजे नेमकं असते तरी काय ?
खरं म्हणे ढगफुटी हा पावसाचाच एक प्रकार आहे. पण यात प्रत्यक्षात ढग वगैरे फुटत नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे म्हणले तर ढगफुटी म्हणजे कमी वेळात जास्त पाऊस ! दिवसाच्या उष्ण तापमानामुळे जमिनीवरील पाण्याची वाफ होऊन “क्यूमोलोनिंबस (एकत्र होणारे) ढग” वरच्या दिशेने वाहतात. दरम्यान वरुनही पावसाचे ढग वाहत असल्याने वरुन येणारे पावसाचे थेम्ब या क्यूमोलोनिंबस ढगांमुळे अडवले जातात आणि खालच्या वाऱ्याच्या जोरामुळे ते वरवर चढत राहतात.
त्यामुळे थेंबांचे आकारमान वाढत जाते. शेवटी वर वाहणाऱ्या वाऱ्याला ते ढग पेलवेनासे झाले की अचानक ढगातील पाणी एकदम जमिनीच्या दिशेने खाली येते. अवघ्या काही वेळातच खूप मोठा पाऊस पाऊस पडतो. यालाच आपण ढगफुटी म्हणतो.
ढगफुटीमुळे पूरपरिस्थिती कशी निर्माण होते ?
ढगफुटीच्या वेळी विशिष्ट भूभागाच्या ठिकाणी अत्यंत कमी काळात जास्त पाऊस पडतो. यावेळी गारा किंवा मोठ्या थेंबांच्या स्वरूपात पाऊस पडतो. अचानक कमी वेळेत जास्त पाऊस पडत असल्यामुळे जमिनीची पावसाचे पाणी शोषून घेण्याची क्षमताही कमी होत जाते आणि एक वेळ अशी येते की जमीन पाणी शोषून घ्यायचे थांबते.
अशावेळी जिकडेतिकडे पाणी वाहू लागते आणि पुरासारखी परिस्थिती निर्माण होते. भारतात ऑगस्ट २०१० मध्ये लेह येथे सर्वात मोठी ढगफुटी झाली होती. त्याचबरोबर २००५ मध्ये मुंबई, २०१३ मध्ये उत्तराखंड, केदारनाथ येथे आणि आता २०१९ मध्ये पुण्यात हा प्रकार पाहायला मिळाला.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.