प्रसिद्ध तेलुगू अभिनेते व कॉमेडियन वेणू माधव यांचे वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी निधन झाले. सिकंदराबादमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने ते ग्रस्त होते. प्रकृती अधिकच बिघडल्याने २४ सप्टेंबर रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र २४ तासांच्या आतच त्यांची प्राणज्योत मालवली.
डॉक्टर आणि कुटुंबातील सदस्यांच्या मते वेणू यांनी आज दुपारी १२.२० ला अखेरचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना सिकंदराबाद मधील एका खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या मित्राने अगोदर ट्विट करून त्यांच्या निधनाची बातमी दिली.
३९ वर्षीय वेणू माधव यांनी आपल्या २०-२२ वर्षांच्या कारकिर्दीत १५० हुन अधिक सिनेमात भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी आपली प्रत्येक भूमिका एवढ्या यशस्वीपणे साकारली होती कि चाहते अक्षरशः पोट धरून हसायचे. ते साऊथचे एक सुप्रसिद्ध कॉमेडियन होते.
त्यांचा महाराष्ट्रात देखील मोठा चाहता वर्ग होता. साऊथच्या सिनेमाना युट्युबवर हिंदीमध्ये डब करून टाकल्या जाते. हे सिनेमा बघणाऱ्यांची देशभरात संख्या प्रचंड आहे. अनेक सिनेमात वेणू माधव यांच्या भूमिका खळखळून हसवणाऱ्या असायच्या.
यामुळं झालं वेणू माधव यांचं निधन-
वेणू माधव यांना लिव्हर आणि किडनीच्या आजारानं ग्रासलं होतं. ते मागील अनेक दिवसांपासून या आजाराने त्रस्त होते. त्यांना १७ सप्टेंबरला जास्त त्रास होऊ लागल्याने सिकंदराबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यानंतर त्यांना सुट्टी देखील देण्यात आली होती.
डॉक्टरांनी त्यांच्या लिव्हर ट्रान्सप्लांट बद्दल देखील कुटुंबाबद्दल चर्चा केली होती. वेणू माधव हे Dr.Paramanandaiah Students या सिनेमात शेवटी दिसले होते. त्यांना तेलगू सिनेमाचा प्राण समजले जायचे. त्यांना दोन मुलं आहेत.
वेणू यांनी हंगामा, आर्या, दिल या सिनेमात केलेल्या भूमिका खूप गाजल्या होत्या. वेणू माधव यांच्या भावाचे जून महिन्यात निधन झाले होते. कार्तिक यांच्या निधनानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. त्यानंतर आता अवघ्या काही महिन्यातच वेणू माधव यांचं निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.