महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एमआरए पोलीस ठाण्यात हायकोर्टाच्या आदेशानुसार अजित पवार यांच्यासह तत्कालीन ७० संचालकाविरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आज अंबलबजावणी संचालनालयाने (ईडी) देखील तपासाचा फास आवळत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर ईडीकडून गुन्हा दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकांमुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना ईडीच्या या कारवाईमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
गुन्हा दाखल झालेल्या ७२ जणांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, सेना, शेकाप इत्यादि पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यामागे राजकारण आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. धक्कादायक म्हणजे शरद पवार हे बँकेचे संचालक नसताना त्यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आघाडी सरकारच्या काळात अनेक सहकारी साखर कारखान्यांना तारण न घेता हजारो कोटींच्या कर्जाचे वाटप केले होते. त्यामुळे बँकेला जवळपास २०६१ कोटींचे नुकसान झाले होते असे आरोप करण्यात आले होते. याविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी २०१५ साली बॉम्बे हायकोर्टात जनहित याचिका दाखल केल्या होत्या.
“दौऱ्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे अशी कारवाई होईल हे अपेक्षितच होतं”-
दरम्यान शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. शरद पवार यांचे नाव याचिकेत होते. याचिकाकर्त्याने तत्कालीन संचालक हे शरद पवारांच्या विचाराचे होते म्हणून त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती.
दरम्यान याविषयी शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे कि, ‘ मी राज्य सहकारी बँकेचा किंवा कुठल्याही बँकेवर संचालक नव्हतो. जर माझ्यावर ED किंवा राज्य सरकारच्या कुठल्या तपस यंत्रणेने केस दाखल केली असेल तर त्यांना मी धन्यवाद देतो. ज्या संस्थेमध्ये मी साधा सभासद देखील नाही, निर्णय प्रक्रियेत मी सहभागी नव्हतो अशामध्ये माझाहि सहभाग करण्याची भूमिका घेतली आहे.’
पुढे बोलताना पवार म्हणाले माझ्यावर जर गुन्हा दाखल केला असेल तर मी त्याच स्वागत करतो. महाराष्ट्रात दौऱ्याला जो प्रचंड प्रतिसाद मिळाला होता त्यानंतर अशाप्रकारची कारवाई होणे अपेक्षित होते असे ते म्हणाले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.