पुणे तिथे काय उणे म्हंटले जाते. हे अगदी खरे असल्याचा अनुभव तुम्ही अनेकदा घेतला असेल किंवा बघितलं असेल. बंगळुरूवरून पुण्याला कामानिमित्त आलेल्या एका व्यक्तीला याचा चांगलाच अनुभव आला आहे. या व्यक्तीला बंगळुरूवरून पुण्याला यायला विमानाने जेव्हढे पैसे लागले असतील त्याच्या जवळपास रुपये हे पुण्यात रिक्षाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास लागले आहेत.
पुण्यातून विमानाने प्रवास करायचा म्हणजे एक – दोन हजार रुपये खर्च होतातच, पण आता पुण्यात रिक्षाप्रवास विमानप्रवासापेक्षा जास्त महागला आहे. पुण्यात पहिल्यांदा आलेल्या एका रिक्षा प्रवासासाठी चक्क ४३०० रुपये भाडे आकारल्याचा प्रकार समोर आला आहे.
रिक्षाचालकाने लुबाडल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. अनेक शहरात या नेहमी घडत असतात. पुण्यातच रिक्षा चालक लुबाडतात असे नाही. पण या ठगाने इतर रिक्षाचालकासारखं मर्यादेत लुबाडलं नाही. या पठ्ठ्याने विनामापेक्षा देखील जास्त भाडं या प्रवाशाकडून घेतलं आहे.
बंगळुरूहून पुण्यात आलेला हा व्यक्ती बुधवारी सकाळी ५ वाजता बसने कात्रज-देहू रोड बायपास मार्गाने कात्रजला पोहचला. तेथुन कॅब बुक करण्याचा प्रयत्न करुनही कॅब न मिळाल्याने त्याने रिक्षा थांबवली. रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत मागे बसला होता तर, त्याचा मित्र रिक्षा चालवत होता. रिक्षाचालकाने मीटरनुसार भाडे घेण्यास मित्राला सांगितले.
हा प्रवाशी येरवडा पोलीस स्टेशनजवळ राहत असलेल्या ठिकाणी पोहचल्यानंतर रिक्षाचालकाने ६०० रुपये शहरात यायचे आणि ६०० रुपये वापस जायचे आणि बाकी मुळ भाडं असे ४३०० रुपये झाल्याचे सांगितले. या प्रवाशाने वाद न घालता ते भाडं दिल पण त्याने त्या रिक्षाचा नंबर लिहून घेतला.
या प्रवाशाने त्यानंतर येरवडा पोलिस स्टेशनमध्ये रिक्षाचालकाविरोधात तक्रार केली. पुढे काय कारवाई झाली याबाबत अधिकची माहिती उपलब्ध नसली तरी रिक्षा चालकाला मात्र चांगली अद्दल घडणे महत्वाचे आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.