प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौर्यावर आहेत. रविवारी Howdy Modi कार्यक्रमाच्या माध्यमातून टेक्सास राज्यातील ह्युस्टन शहरात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत त्यांनी ५०००० अमेरिकन-भारतीय नागरिकांना संबोधित केले.
या दौर्यातच मोदींना गेट्स फाऊंडेशनकडून २४ सप्टेंबर रोजी आज “ग्लोबल गोलकीपर” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. परंतु त्यांच्या सन्मानापूर्वीच ३ नोबेल शांतता पुरस्कार विजेत्यांनी मोदींच्या विरोधात गेट्स फाऊंडेशनला पत्र लिहून मोदींचा सन्मान मागे घेण्याची विनंती केली आहे.
कोण आहेत ते ३ नोबेल शांतता पुरस्कार विजेते ?
२४ सप्टेंबरला मोदींना अमेरिकेत ग्लोबल गोलकिपर पुरस्कार देण्यात येणार आहे, परंतु त्याआधीच त्यांच्या पुरस्काराला विरोध सुरु झाला आहे. २००३ चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते शिरीन एबादी, २०११ चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते तवाक्कुल अब्दील सलाम कामरान आणि १९७६ चे नोबेल शांतता पुरस्कार विजेते मॅरियड मॅगुअर या तिघांनी मोदींच्या पुरस्काराला विरोध केला आहे. गेट्स फाउंडेशनला सविस्तर पत्र लिहून त्यांनी मोदींचा पुरस्कार मागे घेण्याचे आवाहन केले आहे.
मोदींच्या पुरस्काराला विरोध करताना काय म्हटले आहे ?
तीनही नोबेल शांतता पुरस्कार विजेत्यांनी मोदींना ग्लोबल गोलकिपर पुरस्कार देण्यास विरोध असण्यामागचे करणे सांगताना म्हटले आहे की, मोदींच्या नेतृत्वाच्या कार्यकाळात भारत देश धोकादायक आणि अराजकाच्या वातावरणात बदलत चालला आहे. ज्यामुळे मानवाधिकार आणि लोकशाही कमजोर होत चालली आहे. मोदींच्या कार्यकाळात मुस्लिम, ख्रिश्चन आणि दलितांवरील हल्ल्यात वाढ झाली आहे.
मॉब लिंचिंगसारख्या घटनांनी कायद्याचे राज्य कमजोर केले आहे. आसाम आणि जम्मू काश्मीरमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना झालेला हिंसाचार दुर्लक्षित करता येणार नाही. बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन पहिल्यापासून गांधीविचारांचे समर्थक आहे, त्यामुळे मोदींना देण्यात येणार पुरस्कार मागे घ्यावा.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.