सध्या मोदींच्या “हाऊडी मोदी (Howdy Modi)” कार्यक्रमाची चांगलीच चर्चा आहे. अमेरिकेतल्या टेक्सास इंडिया फोरमच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. टेक्सास स्टेटमधील ह्युस्टन येथील NRG मैदानावर हा कार्यक्रम काल २२ सप्टेंबर रोजी पार पडला.
हाऊडी मोदी याचा अर्थ मोदीजी कसे आहात ? यावर मोदींनी “भारतात सर्व छान चालले आहे” असे उत्तर दिले. हा झाला कार्यक्रमाचा विषय ! पण मोदींच्या या दौऱ्याबाबत एक अजून खास विशेष म्हणजे या दौऱ्यात मोदींसाठी खास “नमो थाळी” बनवण्यात आली होती. पाहूया त्याविषयी…
२०१४ च्या दौऱ्यात अमेरिकेहून उपाशी परतले होते मोदी
२०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारताचे प्रधानमंत्री झाल्यानंतर २९ आणि ३० सप्टेंबर २०१४ रोजी राष्ट्रपती बराक ओबामांना भेटण्यासाठी अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्या दौऱ्यात दोन दिवस मोदी अमेरिकेतील वेगवेगळ्या ठिकाणी गेले, पण तरीही मोदींनी काही खाल्लं नाही. त्यावेळी मोदींचे नवरात्राचे व्रत होते.
मोदींच्या व्रताबाबत समजताच बराक ओबामांनी त्यांच्या पाहुणचाराचे सर्व नियोजन बदलले. परंतु मोदींचा उपवास असल्याने त्यांनी केवळ लिंबूपाणी आणि फळांचा ज्यूस घेतला आणि ते मायदेशी परतले होते.
२०१९ च्या दौऱ्यात मोदींसाठी खास “नमो थाळी”
२०१४ च्या दौऱ्यात अमेरिकेला मोदींचा पाहुणचार करता आला नव्हता. २०१९ च्या दौऱ्यात मोदींच्या पाहुणचारात काहीही कमी पडू नये म्हणून मोदींसाठी दोन खास थाळ्या तयार करण्यात आल्या आहेत. नमो थाळी आणि नमो मिठाई ! भारतीय वंशाचे शेफ किरण वर्मा यांनी या थाळ्या तयार केल्या आहेत.
मोदींनी आईसोबत वाढदिवस साजरा करतानाचे जे फोटो शेअर केले होते त्याआधारे या थाळ्या तयार करण्यात आल्या आहेत. नमो थाळीमध्ये मेथी थेपला, खांडवी, समोसा, पुदिना चटणी, डाळ भात, कचोरी, चिंचेची चटणी, खिचडी कढी इत्यादि पदार्थ आहेत तर नमो मिठाई मध्ये गाजर हलवा, रस मलाई, गुलाबजाम, श्रीखंड, खीर इत्यादि पदार्थ आहेत. सर्व पदार्थ देशी तुपात बनवले आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.