मागच्या काही वर्षांपासून ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण वाढले आहे. अनेक पेमेंट बॅंक, इ-वॉलेट्स आली आहेत. ही सगळी माध्यमे ऑनलाईन बँकिंग व्यवसाहारासाठी सोयीस्कर ठरत आहेत. प्रत्येकवेळी बँकेत जायचा, चलन भरायचा त्रास त्यामुळे वाचला आहे.
आपणही असेच ऑनलाईन व्यवहार करत असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पैसे ऑनलाईन हस्तांतरित केल्यानंतर दुसर्या खात्यात वेळेवर जमा झाले नाही तर बँकेला आपल्याला दररोज १०० रुपये द्यावे लागणार आहेत.
आरबीआयने काढली नवी नोटीस
आपण ऑनलाईन ट्रान्झेक्शन करत असताना अनेकदा इंटरनेट प्रॉब्लेम किंवा सर्व्हर डाउनच्या प्रोब्लेममुळे आपल्या ट्रान्झेक्शनला अडचणी येतात. अनेकदा हे ट्रान्झेक्शन अयशस्वी होतात पण आपल्या खात्यावरून पैसे कट होतात. एकतर पैसे ट्रान्सफर होऊ न शकल्याने व्यवहारात अडचण येतेच पण ते पैसे वेळेवर परत न मिळाल्यामुळेही मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
बँकेच्या ग्राहकांना होणारा हा त्रास दूर करण्यासाठी आरबीआयने कारवाईचा बडगा उगारला आहे. आता ट्रान्झेक्शन फेल झाल्यानंतरही वेळेवर पैसे खात्यात जमा न झाल्यास त्या बँकेला प्रतिदिन तुम्हाला १०० रुपये देण्याची नोटीस आरबीआयने काढली आहे.
काय म्हणलं आहे त्या नोटीसमध्ये ?
आरबीआयने २० सप्टेंबरला काढलेल्या या नोटिसीमध्ये म्हटले आहे की, बँक किंवा डिजिटल वॉलेट यापैकी कशावरूनही अयशस्वी झालेल्या ट्रान्झेक्शनचे पैसे ग्राहकाला एका दिवसाच्या आत परत मिळाले नाहीत तर त्यांना ग्राहकाला प्रति दिन १०० रुपयांचा दंड ग्राहकाला द्यावा लागणार आहे.
आरबीआयचा हा नवीन नियम UPI, IMPS,E-Wallets, Card to Card Payments, NACH या सगळ्यांना लागू असणार आहे. आरबीआयने अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन दंडाची रक्कम १०० रुपये ठेवली आहे.
ऑफलाईन व्यवहारांसाठी सुद्धा काढली नोटीस
आरबीआयने केवळ डिजिटल व्यवहारच नाही, तर नॉन डिजिटल व्यवहारांसाठी सुद्धा ग्राहकांचे पैसे खात्यावर पार्ट जमा करण्याचा कालावधी ठरवला आहे. त्यानुसार ATM आणि Micro ATM यामध्ये ट्रान्झेक्शन फेल झाल्यास त्याचे पैसे परत मिळण्यासाठी बँकेला ५ दिवसांची मुदत दिली आहे.
पाच दिवसात बँक ग्राहकाचे पैसे खात्यावर जमा करण्यात अपयशी झाल्यास त्यांना प्रतिदिन १०० रुपये दंड ग्राहकाला द्यावा लागणार आहे. कार्ड स्वाईप मशीनसाठीही ५ दिवसांचीच मुदत देण्यात आली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.