भारतीय बँकांमधून जवळपास ९००० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फरार झालेला दारु व्यावसायिक विजय माल्या सध्या लंडनमध्ये लंडनमध्ये निर्वासिताचे जीवन जगत आहे.
यु.बी.समुह आणि किंगफिशर समुहासारख्या मोठ्या व्यवसायाचा मालक, माजी राज्यसभा खासदार, आयपीएल, फॉर्म्युला वन, फुटबॉल, घोडेस्वारी सारख्या खेळांमध्ये प्रायोजकत्व घेणारा व्यावसायिक, मोठमोठ्या शाळा, हॉस्पिटल बांधणारा आणि टिपू सुलतानची तलवार लंडनमधून भारतात आणणारा व्यक्ती अशी विजय मल्ल्याची वेगवेगळी रुपे आपण बघितली आहेत. आता त्याच मुलगाही आपल्या ऐषोआरामी जीवनशैलीसाठी चर्चेत आला आहे.
विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्याचे ऐषोआरामी जीवन
बाप विजय माल्या भारतातून पळून जाऊन लंडनमध्ये निर्वासितांचं आयुष्य जगत असताना त्याचा मुलगा सिद्धार्थ मात्र ऐषोआरामी जीवन जगत आहे. सोशल मीडियावर सिद्धार्थ खूप अॅक्टिव असतो आणि अनेकदा आपल्या अॅक्टिव्हिटी शेअर करत असतो.
त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर कधी तो फॉर्मुला वन शर्यतीत एन्जॉय करत असताना तर कधी बॉलिवूड अभिनेत्री नरगिस फाखरी आणि ड्यूक बंटर यांच्यासह लॉस एंजेलिसच्या सेंट्रल पार्कमध्ये एन्जॉय करत असताना तसेच ख्रिस गेलसोबत पार्टी करताना त्याच्यासोबत बर्याच हॉट मॉडेल्सही आपण पाहू शकतो.
मौजमजा सोडून सिद्धार्थला हायब्रीड कुत्री पाळण्याचा छंद आहे. आपल्या कुत्र्यांसोबतचा एक फोटो शेअर करताना त्याने म्हटले आहे, “मी कायम असे जगू शकतो.” कॅलिफोर्निया मधील कोचेला येथे आपल्या सुंदर मैत्रिणींसोबत मस्ती करतानाही तो दिसून येतो.
ऑस्ट्रियाच्या वियाना येथे व्हिक्टोरिया बेकर हार्बर या मॉडेलसोबत नाचताना तो बघायला मिळतो. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनसोबत त्याने फोटो टाकला आहे. आपला मित्र आशिष दुगर यांच्यासह मलिबू बीचवर त्याचा फोटो आहे.
ब्राह्मण नमन, होमकमिंग नावाच्या चित्रपटात सिद्धार्थ माल्याने काम केले आहे. टीव्ही होस्ट तसेच मॉडेल म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. आयपीएलमढी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा निर्देशक म्हणूनही त्याने काम केले आहे. आपला बराच वेळ तो फिटनेससाठी जिममध्ये घालवतो.
दीपिका पदुकोण, कॅटरिना कैफ, सोफी चौधरी, फ्रिडा पिंटो अशा अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे अफेअर असल्याच्या चर्चा झाल्या. एका आयपीएल सामन्यादरम्यान दीपिकाचे चुम्बन घेतानाचा त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.