राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्याध्यक्ष दीपक साळुंखे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा दिला. दीपक साळुंखे सांगोला विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता होती. पण त्यांच्या मुलाने एक पत्र शरद पवारांना लिहिलं आहे जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.
काय आहे या पत्रात?
साहेब सस्नेह दंडवत,
मी, प्रा.राज साळुंखे, आपणास या निवेदनाद्वारे नम्र विनंती करीत आहे….कदाचित माझ्या विनंतीत अपरिपक्वता असेल, सामंजस्य पणाचा अभाव असेल राजकिय कमजोरी असेल पण आमचं आयुष्य साहेब या एका शब्दाभोवती फिरतय म्हणून खुप अपेक्षेनी लिहितोय.
साहेब माझ्या शब्दातून मी कदाचित स्तुती करतोय असेही वाटेल जे तुम्हाला कधीच आवडत नाही…. पण साहेब मी स्वतः जे अनुभवलय , जे डोळ्याने पाहिलय तेच लिहितोय. सांगोला आणि द.सोलापूर या दोन तालुक्याचा तिळमात्र संबंध नाही, माझा आबांना काडीचाही फायदा नाही पण साहेब या व्यक्तीमत्वावर ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं त्या सर्वांना आबांनी डोक्यावर घेतलं, खूप प्रेम दिलं, म्हणुनच आज आबांसाठी मन खुप अस्वस्थ होते.
साहेब तुम्ही दिलेली प्रत्येक जबाबदारी आबा खुप प्रामाणिक पणे पार पाडताना आम्ही पाहिले आहे, सर्वांना सोबत ठेवत आबा आणि जयमाला ताईंनी पक्षासाठी खुप मेहनत घेतली आहे. अंगावर एकही डाग न पडू देता, अनेकांकडून अनेक गोष्टी सहन करुन साहेब हाच आपला विठ्ठल म्हणून मनोभावे केलेली भक्ती सुध्दा त्यांनी आजवर कोणाला कळु दिली नाही.
आबांनी राजीनामा दिल्याची बातमी कळताच पोटात धडकी भरली, जिल्ह्यात साहेबांवर मनोभावे प्रेम करणारा एकमेव माणूस म्हणजे आबा…. साहेब कोणत्याही परिस्थितीत आबांना राष्ट्रवादी ची उमेदवारी मिळणे खुप गरजेचे आहे.
आबांनी २५ वर्षे विनातक्रार अविरतपणे आपला शब्द प्रमाण मानुन काम केले, आजही आबा आपल्या शब्दाच्या पुढे कधीच नाहीत पण आबांचे वय लक्षात घेता आता थांबणे म्हणजे राजकीय करिअर स्वतः हुन संपवणे आहे, त्यात कार्यकर्ते स्वैरभैर झालेत, आबा आता नाही तर कधीच नाही अशी टोकाची भूमिका घेत आहेत….
साहेब आबांचे आपल्यावर आतोनात प्रेम आहे आणि आमच्या सारख्या साहेबांवर प्रेम करणार्या फाटक्या कार्यकर्त्यांचा आबा आधार आहेत…. साहेब आजवर आपण अनेक रंकाचे राव बनवलेत आता फक्त आबांना आपल्या पक्षाची उमेदवारी द्या हीच माफक मनोभावी आपेक्षा…
धन्यवाद साहेब.
आपलाच,
यशराज साळुंखे
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.