१९ वर्ष म्हणजे काय वय झालं का ? या वयात मुलांना नुकताच मतदानाचा अधिकार आलेला असतो. तारुण्यात पदार्पण करणारी मुलं या वयात कॉलेजमध्ये उच्चशिक्षण घेत असतात, मित्र मैत्रिणींसोबत हिंडत फिरत असतात. विकेंडला मौजमजा करत असतात.
मोकळा वेळ आहे म्हणून खेळत असतात. परंतु ज्या वयात शिकायचं असतं , खेळायचं असतं; त्या वयात या तरुणाने देशासाठी जे काम करुन दाखवले ते मोठमोठ्या लोकांना जमत नाही. त्याची कहाणी वाचल्यानंतर तुमच्या डोळ्यात आपोआप पाणी येईल.
डोळ्यात देशाच्या रक्षणाचे स्वप्न घेऊन तो आर्मीत आला
सचिन शर्मा असे त्या मुलाचे नाव ! हरियाणाच्या पानिपत जवळील गोयला खुर्द गावात राहणाऱ्या सचिनला लहानपणापासूनच भारतीय आर्मीची आवड होती. स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रचंड मेहनत घेणारा मुलगा म्हणून सगळे त्याला ओळखायचे.
बारावी उत्तीर्ण होताच गरिबीवर मात करत सचिन भारतीय सेनेत भरती झाला. १२ डिसेंबर २०१६ ही ती तारीख ! प्रशिक्षण घेऊन लवकरच तो राजपुताना रेजिमेंटच्या १६ बटालियनमध्ये तो रुजू झाला. २०१७ मध्ये अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यातील भारत-चीन सीमेवर त्याची नेमणूक झाली.
…नियतीने घाला घातला
१६ जानेवारी २०१८ यादिवशी सचिन नेहमीप्रमाणे अरुणाचल प्रदेशातील भारी-चीन सीमेच्या १२०-१५० किमी परिसरात पेट्रोलिंग करत होता. त्याचवेळी नक्षलवाद्यांचा हल्ला झाला. चकमक सुरु झाली. अचानक सचिनला उलट्यांचा त्रास सुरु झाला. काही वेळाने रक्ताच्या उलट्या सुरु झाल्या.
काही वेळातच सचिनने प्राण सोडले. मरणाच्या एक दिवस आधीच त्याने आपल्या आईला फोन करुन “मी लवकरच घरी येत आहे” असे सांगितले होते. त्याला दोन महिन्यांची रजा मंजूर झाली होती. पण नियतीने आधीच घाला घेतला आणि भारतीय सेनेने एक उमदा जवान गमावला.
वडिलांनी लग्नाबद्दल विचारल्यानंतर सचिन बोलला होता…
सचिनचे वडील सुरेंद्र कुमार यांनी काही दिवसांपूर्वी सचिनला त्याच्या लग्नाबद्दल मुलगी बघण्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी सचिनने सांगितले, ” अगोदर लहान बहीण अंजु आणि भाऊ साहिल यांना शिकवतो. जर मी आताच लग्न केलं आणि मी शहीद झालो तर तुमच्यावर सून सांभाळण्याचं ओझं पडेल.” या गोष्टी बोलत असताना सचिनचे कुटुंबीय भावुक झाले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.