रुग्णासाठी सरकारने रुग्णवाहिका दिल्या आहेत. परंतु सरकारी यंत्रणेला लागलेली कीड आणि भ्रष्ट कारभार एका शेतकऱ्यावर असा अन्याय झाला कि आपण विचारहि करू शकणार नाही. मानवतेला काळिमा फासणारी हि घटना उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे घडली आहे.
प्रसंग असा आहे कि, ५ दिवस अगोदर शंकरगड येथील मजूर कल्लू यांच्या पत्नी सोना देवी यांच्या डोक्याला दुखापत झाल्यामुळे दवाखान्यात भरती करण्यात आले होते. जिथे गुरवारी इलाज सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूमुळे कल्लू आपल्या मुलासोबत हंबरडा फोडून रडला. त्यानंतर प्रश्न होता पत्नीला अंत्यविधी करिता गावी नेण्याचा.
दवाखान्याला कल्लू नि रुग्णवाहिकेची मागणी केली परंतु कल्लू ला सांगण्यात आले कि एक हि रुग्णवाहिका दवाखान्यात उपलब्ध नाही आहे. आणि प्रायवेट रुग्णवाहिकेचे चालक त्याला ३००० रुपये भाडे मागू लागले तर गरीब कल्लू मागे हटला.
हरलेला कल्लू आपल्या पत्नीचा मृतदेह लोटगाड्यात टाकून निघाला अनेकांनी त्याला रस्त्यात बघितले हळहळ परंतु कोणीही कल्लूला मदत करायला पुढे आले नाही. एसआयन हॉस्पिटल विषयी मनात राग आणि पत्नीचे दुख दोन्ही सोबत घेऊन कल्लू चालत राहिला.
दवाखाना ते शंकरगड हे अंतर ४५ किमी एवढे आहे पूर्ण अंतर कल्लूने पैदल लोटगाडा ढकलत काढले. कल्लू सरकारी यंत्रणेपुढे आणि गरिबी पुढे हरला होता. असे देशात अनेक कल्लू आहेत परंतु त्यांच्या गोष्टी पुढे येत नाही.
आपण अश्या लोकासाठी मदत करायला हवी. आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.