कोण बनेगा करोडपती मध्ये गुरवारी प्रदर्शित झालेल्या भागात महाराष्ट्राच्या बबिता ताडे १ करोड रुपये जिंकल्या ! त्यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. शाळेत खिचडी शिजवनाऱ्या बबिताताई रातोरात करोडपती झाल्या.
बबिता ताडे अमरावती जिल्ह्यातील पंचफुलाबाई हरणे खिचडी शिजविण्याचे काम करतात याच विद्यालयात त्यांचे पती शिपाई आहे. बबिताताई यांचे शिक्षण पदवी पर्यंत पूर्ण झालेले आहे त्या नंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षणासाठी एक वर्ष शिक्षण घेतले. परंतु पोटाची भूक मोठी असते त्यांनी कुटुंबाच्या जवाबदारी वाढल्यामुळे शिक्षण बंद केले.
या काळात त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास देखील केला आहे. नंतर त्यांनी कौटुंबिक जवाबदारीमुळे पूर्ण वेळ आपल्या कामाला दिला. केशव तायडे हे बबिताताईचे पती मुळचे अकोला जिल्हातील चोहोटा येथील आहे. परंतु नौकरीमुळे मागील २३ वर्षापासून ते अंजनगाव येथे स्थायिक झालेले आहे.
१५०० रुपये महिन्यांनी काम करणाऱ्या बबिता ताडे ४५० मुलासाठी रोज खिचडी बनवीत होत्या. पैसे जिंकल्यावर काय करणार हे विचारल्यावर बबिताताईनि सांगतले कि त्यांना मंदिर बांधायचे आहे, मुलांना चांगले शिक्षण द्याचे आहे आणि पूर्ण घरात एकच मोबाईल असल्याने एक चांगला फोन पहिले घ्याचा आहे. हे ऐकल्यावर अमिताभ बच्चन यांनी स्वतः त्यांना एक स्मार्ट फोन गिफ्ट केला.
हि गोष्ट ऐकून अमिताभ यांनी स्वतः बबिताताईना एक स्मार्टफोन गिफ्ट केला. परंतु त्यांनी सांगितले कि आता हा फोन त्यांना वापरता येत नाही घरी गेल्यावर मुलाकडून शिकून घेणार. मागील अनेक वर्षापासून त्या केबीसी मध्ये येण्याचा प्रयत्न करत होत्या.
काय होता एक करोड रुपयाचा प्रश्न
मुगल शासक बहादुर शाह जफर के किस दरबारी कवि ने दास्तान-ए-गदर लिखी थी, जिसमें उन्होंने 1857 के विद्रोह के अपने निजी अनुभवों के बारे में लिखा था?
A. मीर तकी मीर B. मोहम्मद इब्राहिम जौक C. जहीर देहलवी D. अबू अल कासिम फिरदौसी
उत्तर:- जहीर देहलवी
त्यांना या नंतर ७ करोडचा प्रश्न विचारल्या गेला. त्यांना या प्रश्नाचे उत्तर माहिती असून त्यांनी रिस्क न घेता हा खेळ सोडून दिला. आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आमचे पेज लाईक करायला विसरू नका.