अनुभवी स्प्रिंटर हिमा दासने एका पाठोपाठ सहा सुवर्ण पदके घेऊन भारताचे नावलौकिक केले. हिमा दास म्हणजे सुवर्णपदक हे सुत्रच झालंय आता ! ढिंग एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या भारताच्या युवा धावपटू हिमा दास हिने या महिन्यात एकापाठोपाठ एक असे सहा सुवर्णपदक पटकावून सोन्याची कामगिरी केली आहे.
तिच्या कामगिरीमुळे प्रत्येक भारतीयांची मान उंचावली आहे. हिमा दासीचे वय केवळ १९ वर्ष आहे, पण तिने या वयात हिमालयाएवढी कामगिरी केली याचे जास्त कौतुक आहे. हिमा ने जुलै ते ऑगस्ट मध्ये हि पदके जिंकली. एएफआय ने प्रसिद्ध केलेल्या यादीत नउ जुलैला झालेल्या घोषणेत हिमा वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशीप मध्ये ४०० मीटर रिले आणि ४०० मीटर मिश्र रिले मध्ये ती सहभागी होणार होती.
२७ सप्टेंबर ते ६ ऑक्टोंबर या काळात हि स्पर्धा दोहा येथे होणार आहे. एएफआय ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या पत्रकात हिमा दास या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही असे जाहीर केले आहे. हिमा या स्पर्धेत ७ खेळाडूंच्या संघात समावेश करण्यात आला होता.
हे आहे नेमके कारण
हिमा दासच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे हिमा या स्पर्धेतून बाहेर पडली आहे असे एएफआय ने स्पष्ट केले आहे. भारतीय एथलेटिक्स महासंघ (एएफआय) यांनी हि माहिती twitterवर प्रसिद्ध केली आहे. भारताकरिता हि एक दुखाची बातमी आहे.
एक चांगली गोष्ट म्हणजे एएफआयने दिलेल्या निमंत्रणामुळे दुती चंद १०० मीटर करिता या स्पर्धेत भाग घेणार आहे.
आपल्याला हि माहिती पटल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक कार्याला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.