महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा पहिला पंजाबी म्युझिक अल्बम लाँच झाला आहे. याविषयीची माहिती स्वतः अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली. या अल्बम मध्ये त्या पंजाबी/बॉलीवूड मिक्स गाणे गाताना दिसत आहेत. युट्युब वर नुकतेच हे गाणे लाँच झाले आहे. अमृता फडणवीस या एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असल्याचे आपण जाणतो. यापूर्वी त्यांच्यातील अनेक कलागुण बाहेर आले आहेत. या नविन पंजाबी अल्बमद्वारे त्यांच्या अष्टपैलू मधील आणखी एक पैलू समोर आला आहे. याआधीही अमृता फडणवीस गाण्याच्या माध्यमातून अनेकवेळा कॅमेऱ्यासमोर झळकल्या आहेत. आपण त्यांच्या सुरासोबत अभिनयाची जादूही अनुभवली आहे. मुख्यमंत्री यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गाण्यामध्ये असल्याने या गाण्याने लोकांचे विशेष ध्यान आकर्षित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीच्या पंजाबी लुकची सुद्धा सध्या चांगलीच चर्चा होताना दिसत आहे.
अमृता फडणवीस यांना पूर्वीपासून कलाक्षेत्रात खूप रुची आहे. यापूर्वी अमृता फडणवीस यांनी एका हिंदी अल्बम मध्ये बॉलीवूडचे महानायक अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतही काम केले आहे. फिर से असं या म्युझिक व्हिडीओचं नाव होतं. अहमद खान यांनी दिग्दर्शक केलेल्या या गाण्याची निर्मिती भूषण कुमार यांनी केली होती.
अमृता फडणवीस यांचा जो नवीन अल्बम लाँच झाला आहे त्याचे नाव साड्डी गली/रेल गाडी आहे. जवळपास 4 मिनिटांचा हा अल्बम टी-सिरीज या सुप्रसिद्ध म्युझिक कंपनीने रिलीज केला आहे. यामध्ये अमृता वेस्टर्न कपड्यांमध्ये परफॉर्म करताना दिसत आहे. या अल्बम मध्ये अमृता फडणवीस यांच्या सोबत पंजाबी सिंगर दीप मोनी आणि प्रीत हरपाल यांनीही आवाज दिला असून, ते दोघेही अमृता फडणवीस यांच्या सोबत या गाण्यात दिसत आहेत. अमृता यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत लिहिले आहे की, ‘ Watch & Listen to the dhamaal song… SADDI GALI/RAIL GADDI.
या गाण्याचा अधिकृत व्हिडीओ बघण्यासाठी खाली क्लिक करा…
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
अधिक वाचा: अमिताभ बच्चन यांच्या जीवनातील सर्वात मोठ्या 3 चुका, ज्याचा त्यांना पण आहे पश्चाताप