ICICI नामांकित बँक आहे आता हि बँक एवढी मोठी झाले आहे कि स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहे. ग्राहकांचा विचार करताना सध्या बँक दिसत नाही आहे त्यामुळे आता सरळ आपण काय असा निर्णय घेतला या गोष्टीवर येऊया..
झिरो बॅलन्स खाते
कधी कधी आपले खात्यामध्ये कमी रक्कम असते त्याला झिरो बॅलन्स म्हणतात. आणि असे खाते असणार्या ग्राहका करिता हा नियम बनविण्यात आलेला आहे. नियम असा बनविण्यात आला आहे कि कुठल्याही शाखेत या ग्राहकांना कॅश काढायला किंवा जमा करायला १०० ते १२५ रुपये एवढा चार्ज लागणार आहे. मशीन वरून जरी पैसे जमा केले तरी त्यांना हा चार्ज लागणार आहे.
हा नियम १६ ऑक्टोंबर पासून लागू होणार आहे. १३ सप्टेंबरला बँकेनि एक पत्रक काढून हे जाहीर केलेले आहे. त्यांचे म्हणणे हे आहे कि ” त्यांना ग्राहकांना डिजिटल पेमेंट करिता हा निर्णय घेतलेला आहे. यामुळे डिजिटल इंडियाला चालना मिळेल.
बँकेनि डिजिटल पेमेंट वाढविण्या करिता अजून एक निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये NEFT, RTGS आणि UPI वर लागणारे सर्व चार्ज रद्द केले आहे. सध्या आपणास १० हजार ते १० लाख NEFT करिता २.२५ पासून २४.७५ gst मिळून अधिक चार्ज द्यावा लागत होता.
बँकेनि आपल्या झिरो बॅलन्स असलेल्या खातेधारकांना विनंती केली आहे कि आपले खाते हे दुसर्या बेसिक खात्यात रुपांतरीत करून घ्यावे. जर ते हे करू शकत नाही तर आपले खाते बंद करून टाकावे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करावी व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com वर पाठवू शकता.