केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करून नवीन कायदा १ सप्टेंबर पासून लागू केला आहे. या कायद्यात दंडाची रक्कम अनेक पटीने वाढल्यामुळे अनेकांची पंचाईत होत आहे. १ सप्टेंबर रोजी हा संशोधित मोटर वाहन कायदा १९८८ लागू करण्यात आला. मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती करावी यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी गेल्या पाच वर्षांपासून प्रयत्न करत होते.
मोटार वाहन कायदा नियमात आणि त्यांचे उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले आहेत. ड्रायव्हिंग लायसन्स सोबत नसेल तर पाचशे रुपयांऐवजी दहापट म्हणजे तब्बल पाच हजार रुपये दंड मोजावा लागणार आहे. दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या चालकांकडून दोन हजार रुपये दंड वसूल केला जात होता, तोही आता दहा हजार रुपयांवर नेण्यात आला आहे.
तर विना हेल्मेटने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारास १ हजार रुपये दंड आकारण्यात येत आहे. हे नवे नियम गुजरातच्या एका फळविक्रेत्याला चांगलेच महागात पडत आहेत. गुजरातमधील झाकीर मेमन या व्यक्तीने वाहतुकीचे नियम पाळण्याचे ठरवले तरी त्यात त्याला एक मोठा अडथळा येत आहे. झाकीरच्या डोक्याच्या मापाचे हेल्मेटचा बाजारात उपलब्ध नाहीये.
त्यामुळे त्याने कितीही ठरवलं तरी तो वाहतुकीचा हा नियम पाळू शकत नाहीये. गुजरात सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल करत अनेक नियमांच्या दंडांची रक्कम कमी केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मोटार वाहन कायद्यात बदल करण्यात येत असल्याची माहिती दिली. या नवीन बदलानुसार दंडाची रक्कम ५० टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे.
त्यामुळे झाकीरला १००० रुपयांऐवजी ५०० रुपये का होईना दंड भरावाच लागत आहे. झाकीर यांच्या डोक्याचा आकार हेल्मेटपेक्षा मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्याच्या आकाराचे हेल्मेट बाजारात उपलब्ध नसल्याचे झाकीर यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर, पोलिसांनाही या समस्येवर तोडगा कसा काढायचा हेच कळेना.
झाकीर वाहतुकीचे इतर सर्व नियम पाळतो पण त्याची इच्छा असूनही तो हेल्मेट घालू शकत नाही. त्यामुळे त्याला नेहमीच पोलीस पकडतात. पोलिसांनी पकडल्यावर तो त्याची समस्या पोलिसांना सांगतो. पण प्रत्येक वेळी पोलीस त्याचं ऐकतातच असे नाही. त्याला अनेकदा दंड भरावा लागतो.
त्यामुळे दुचाकीवरुन घराबाहेर पडल्यानंतर त्याला नेहमीच सोबत जास्त पैसे बाळगावे लागतात. वाहतूक पोलिसांच्या भितीने त्याला नेहमी पैशाची गरज भासते. त्याच्या कुटुंबियांनाही त्यामुळे त्याची चिंता वाटते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.