राजकीय नेत्यांच्या भाषणांतून होणारे मनोरंजन पाहण्यात लोकांना आनंद मिळत असताना किंवा टीव्ही, वर्तमानपत्रातून राजकारणाच्या बातम्या लोक हौसेने वाचत असताना अशा वातावरणात डॅन बिल्जेरियन नावाच्या कुठल्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहित आहे का असा प्रश्न विचारणे हे तसे धाडसीपणाचे होईल.
पण जरा थांबा, लगेच पुढे जाऊ नका. जरा थांबून हे वाचा. कारण डॅन बिल्जेरियन हा कुणी साधासुधा माणूस नाही. सध्या त्याच्याबद्दल बरंच काही बोललं, लिहलं जात आहे. सध्या तो मुंबईत आला असून आमच्या वाचकांनाही त्याच्याबद्दल माहिती असावी म्हणून हा प्रयत्न…
कोण आहे डॅन बिल्जेरियन ?
तर मंडळी आपण ज्याच्याविषयी बोलत आहोत तो डॅन बिल्जेरियन हा इंटरनेटवरील अतिशय प्रसिद्ध असा आर्मेनियन-अमेरिकन जुगारी असून त्याला “किंग ऑफ इंस्टाग्राम” म्हणून ओळखले जाते. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटला २.८३ कोटींहून अधिक लोक फॉलो करतात.
आपल्या श्रीमंती, महागड्या गाड्या, आलिशान घरे, शस्त्रे, विमान यासोबतच मादक तरुणींसोबतच्या न्यूड फोटोंचे तो आपल्या इंस्टाग्रामवरुन नेहमी प्रदर्शन करत असतो. त्याला “इंस्टाग्रामचा प्ले बॉय” म्हणुनही ओळखले जाते. सर्व सोशल मीडियावर त्याचे जवळपास ४.२० कोटींहून अधिक फॉलोवर्स आहेत.
जुगार खेळून बनला डॅन १००० कोटींचा मालक
शाळेत बंदूक घेऊन गेला म्हणून डॅनला शाळेतून काढल्यावर तो काही काळ नेव्हीत गेला. तिथूनही याला काढल्यावर तो फ्लोरिडा विद्यापीठात कॉलेज करायला लागला. तिथेच तो जुगार खेळायला शिकला. सुरुवातीला जुगारात तो आपले सर्व पैसे हरला.
त्यावेळी आपली गन विकून त्यातून आलेले ७५० डॉलरचा जुगार खेऊन त्यातून १०००० डॉलर कमवले आणि तेव्हापासून मागे वळून पहिले नाही. लॉस वेगासला आल्यानंतर त्याने त्याच १०००० डॉलरमधून १८७००० डॉलर कमावले. जुगार खेळून डॅन १००० कोटी रुपयांहुन अधिक संपत्तीचा मालक बनला आहे.
मुंबईला कशासाठी आलं आहे डॅन बिल्जेरियन ?
डॅन बिल्जेरियनचे जगभरात चाहता वर्ग आहे. भारतातही त्याचे फॉलोवर मोठ्या संख्येने आहेत. डॅन बिल्जेरियन सध्या भारतामध्ये आला असून मुंबईच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये थांबला आहे. भारतातही प्रसिद्ध असणाऱ्या एका पोकर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी याचे भारतात आगमन झाले आहे.
भारतातील हा सर्व मोठा पोकर शो आहे. भारतातील त्याच्या चाहत्यांना त्याला भेटण्याची ही सुवर्णसंधी आहे. डॅनने हॉलिवूडच्या काही चित्रपटात देखील काम केले आहे. यानिमित्ताने बॉलिवूड इंडस्ट्रीच्या लोकांनाही त्याला भेटण्याची संधी प्राप्त झाली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.