बॉलिवूड अभिनेता सनी देओल यांना पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाने उमेदवारी दिली होती. सनीने काँग्रेसच्या सुनील जाखड यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला. सनी देओलने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपल्या चल-अचल संपती आणि वैयक्तिक जीवनाबद्दलची माहिती अर्जासोबत दिली होती.
सनी देओलने काँग्रेसच्या सुनील जाखड़ यांचा पराभव केला. सनी देओलने ‘अजय सिंह देओल’ या नावाने अर्ज दाखल केला होता. या अर्जसोबतच सनीने आपल्या संपत्ती आणि शिक्षणाचेही विवरण दिले होते. खासरेवर जाणून घेऊ त्याची संपत्ती नेमकी किती आहे.
सनीने १९७७-७८ मध्ये एक्टींगचा डिप्लोमा पूर्ण केला आहे. तर सनीकडे एकूण ८७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. मात्र, ५३ कोटी रुपयांचे कर्जही सनी देओल कडे आहे.
सनीकडे ६० कोटी रुपयांची जंगम संपत्ती आणि २१ कोटी रुपयांची स्थावर संपत्ती असून बँकेत ९ लाख रुपये आणि २६ लाख रुपयाची रोकड आहे. तर, सनीच्या पत्नीचे नाव पूजा असून त्यांच्याकडे ६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
पूजा यांच्या बँक खात्यात १९ लाख रुपये असून १६ लाखांची रोकड त्यांच्याकडे आहे. तर पूजा यांच्याकडे कुठलिही स्थावर मालमत्ता नाही. सनी आणि पूजा देओल यांच्यावर बँकांचे ५१ कोटी रुपयांचे कर्ज आहे.
त्यामध्ये २.५ कोटी रुपयांचे सरकारी कर्ज असून ७ कोटी रुपयांचे जीएसटी भरणेही बाकी आहे. दरम्यान, सनीचे माता-पिता म्हणजेच हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांची संपत्ती एकूण २४९ कोटी रुपये एवढी आहे. त्यामध्ये धर्मेंद्र यांच्याकडे १३५ कोटी तर हेमा यांच्याकडे ११४ कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.