जागतिक प्राणी आरोग्य संघटनेने (OIE) भारताला पक्ष्यांना होणाऱ्या प्राणघातक अशा एव्हीयन इन्फ्लूएन्झा (H5N1) म्हणजेच बर्ड फ्लू रोगापासून मुक्त देश घोषित केले आहे. ३ सप्टेंबर रोजी ही घोषणा करण्यात आली.
भारताने यापूर्वीच स्वतःला बर्ड फ्लू मुक्त देश घोषित केले ओटे, परंतु जागतिक प्राणी आरोग्य संघटनेच्या घोषणेनेन त्यावर शिक्कामोर्तब झाले असून भारतासाठी ही आनंदाची बातमी आहे. पाहूया काय होता हा आजार आणि कसा झाला भारत बर्ड फ्लू मुक्त…
बर्ड फ्लू रोग काय होता ?
माणसांप्रमाणेच पक्षांनाही ताप येतो. त्यालाच बर्ड फ्लू म्हणतात. पोल्ट्रीतील कोंबड्या, बदक या रोगाचे मोठ्या प्रमाणावर शिकार ठरतात. पक्ष्यांमध्ये होणाऱ्या विषाणूंमुळे उद्भवणारा हा रोग आहे. या रोगाचे विषाणू पक्ष्यांच्या विष्ठेत असतात.
हा रोग माणसांकडून माणसांना होत नाही. बर्ड फ्लू झालेल्या पक्षांचे मांस, अंडी किंवा त्यांच्याशी संसर्ग झाल्यासच हा रोग होतो. पक्षांकडून माणसाला बर्ड फ्लू झाल्याची घटना १९९७ मध्ये समोर आली होती. भारतात २००६ मध्ये हा रोग निदर्शनास आला होता.
बर्ड फ्लू झाल्यावर काय होते ?
बर्ड फ्लूचे विषाणू माणसाच्या श्वसन प्रणालीवर परिणाम करतात. सुरुवातीला सर्दी खोकला आणि ताप ही त्याची लक्षणे आहेत. काही प्रसंगात माणसाचा मृत्यूही होतो. भारतात या रोगाचा सर्वात मोठा उद्रेक २००८ मध्ये पश्चिम बंगालमध्ये झाला होता.
आतापर्यंत हा रोग ४९ वेळा देशातील वेगवेगळ्या राज्यात २२५ ठिकाणी पसरला असून त्यामध्ये सुमारे ८३ लाखांहून अधिक पक्षी मारण्यात आले आहेत. यासाठी २६ कोटींपेक्षा अधिक नुकसानभरपाई देण्यात आली आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.