चंद्राकडे बघून आपल्या लोकांनी न जाणो काय काय केले असेल ! आईने मांडीवर झोपवताना चांदोमामाची गोष्ट सांगितली असेल. चतुर्थी किंवा रोजाचे उपवास ठेवले असतील. शाळेत शिक्षकांनी चंद्रग्रहण शिकवले असेल. तारुण्यात चंद्रातच आपल्या प्रेयसीचा चेहरा पाहिला असेल.
चंद्रावर कविता, चारोळ्या, शायरी केल्या असतील. चंद्रावर कित्येक गाणी गायली असतील. म्हणजेच लाखो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चंद्राचा आपल्या जीवनावर इतका प्रभाव आहे. भारतातच नाही, तर भारताबाहेरच्या लोकांवरही चंद्राचा प्रभाव आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर माणसाचं चंद्रावर पाऊल
एकमेकांवर वरचढ होण्याच्या नादात मानवजातीने दोन दोन महायुद्धे लढली. तरीही मन भरले नाही म्हणून शीतयुद्ध सुरु झाले. जग दोन गटात विभागले गेले. कम्युनिस्ट आणि कॅपटलिस्ट ! हे युद्ध मैदानावर नाही, तर पडद्यामागे लढले गेले. त्यातून स्पर्धा वाढली.
अंतराळात जाण्यासाठीही स्पर्धा सुरु झाली. स्पेस रेस सुरु झाली. यात रशियाने बाजी मारत १२ एप्रिल १९६१ रोजी अंतराळात पहिला अंतराळवीर पाठवला, युरी गागरीन ! अमेरिकेचा तिळपापड झाला. २३ दिवसांनी अमेरिकेनेही आपला पहिला अंतराळवीर एलन शेफर्ड याला अंतराळात पाठवले.
चंद्रावर जाण्याची स्पर्धा सुरु झाली
अंतराळात पहिल्यांदा जाण्याच्या स्पर्धेत रशियाने अमेरिकेला मात दिली. पण अंतराळ तर अनंत आहे. मग स्पर्धाही अनंत काळ चालणार यात काय वाद नव्हता. या स्पर्धेचा पुढचा मुक्काम होता तो चंद्रावर ! अमेरिकेची नजर चंद्रावर होती. १६ जुलै १९६९ रोजी अमेरिकेचे तीन अंतराळवीर अपोलो यानातून चंद्रावर पाऊल टाकण्यासाठी निघाले. नील आर्मस्ट्रॉंग, बज एल्ड्रिन, मायकल कॉलिन्स !
यापैकी मायकल कॉलिन्स यांना कमांड मोड्यूल पायलट म्हणून चंद्राभोवती गिरक्या मारायच्या होत्या. बीज एल्ड्रिन यांना लुनार मोड्यूल पायलट म्हणून नील आर्मस्ट्रॉंगला चंद्रावर उतरवण्याचे काम करायचे होते.
आणि चंद्रावर पाऊल पडले आणि गंमत घडली
अंतराळमोहिमेत जुनिअर पायलटला प्रथम बाहेर निघण्याचे निर्देश असायचे. पण ही मोठी मिशन असल्याने सिम्बॉलिक महत्व अधोरेखित करण्यासाठी नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले. चंद्रावर उतरताच नील आर्मस्ट्रॉंगने सॅम्पल गोळा करायला सुरुवात केली. बज एल्ड्रिनने ते बघितले आणि तो देखील खाली उतरला. चंद्रावर पाऊल ठेवणारा तो दुसरा व्यक्ती बनला. पण एक गंमत घडली.
चंद्रावरील मोकळ्या वातावरणात बज एल्ड्रिनला लघुशंका आणि त्याने बिनधास्तपणे तिथेच लघुशंका करून टाकली. चंद्रावर पहिले पाऊल ठेवता आले नाही म्हणून काय झाले, चंद्रावर पहिली लघुशंका करणारा माणूस बज एल्ड्रिन ठरला. आता हे माहीत झाल्यावर आपल्या गावच्या पारावरच्या गप्पांमध्ये चंद्रावर मावा खाऊन थुंकणारा पहिला माणूस बनण्याची इच्छा कुणी व्यक्त केली त्या व्यक्तीने बज एल्ड्रिनला नवस बोलायला हरकत नाही.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.