६४ कला आणि १४ विद्यांचा अधिपती असणार्या गणपतीचे पूजन करून आप शुभ कार्याची सुरवात करतो. संपूर्ण महाराष्ट्रात गणपती उस्त्वाची धामधूम सुरु झाली प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा स्थापना करून मनोभावे पूजा करण्यात येत आहे. परंतु बापाची प्रतिमा सुध्दा तुम्हाला आरोग्याकरिता काही संदेश देतो तो खालील प्रमाणे आहे.
१) मोठं डोकं – ज्ञानाचे भंडार
शारीरक उंची पेक्षा बौद्धिक उंची सर्वाना आवश्यक असते. मोठे डोके म्हणजे ज्ञानाचे प्रतिक आहे. बाप्पा सांगतो बौद्धिक ज्ञान सर्वांनी वाढवावे. त्याकरिता ह्या दिशेने आजच पर्यंत सुरु करा…
२) मोठे कान- अधिक दक्षतेने ऐका
मोठे कान म्हणजे कशासाठी ? कोणी काही सांगत असल्यास ते लक्षपूर्वक एका व ग्रहण करा. कारण यामुळे गैरसमज निर्माण होतात. म्हणून मोठ्या कानाचा बाप्पा आपल्याला सांगतो दक्षतेने एका..
३) नाजून डोळे – अधिक एकाग्रता
जीवन कधीच स्थिर किंवा आपल्याला अपेक्षित वेगाने जात नाही. ते प्रवाही आणि वर-खाली जाणारे असते. त्यामुळे तुम्हांला नेमकी कशाची गरज आहे. त्या गोष्टींची निवड करा आणि त्यावरच तुमचे लक्ष केंद्रित करा. यामध्ये अधिक फीट राहण्याचा प्रयत्न असेल किंवा तणावमुक्त जगण्याचा प्रयत्न असेल. तुमच्या गरजेनुसार आणि क्षमतेनुसार तुमचे लक्ष्य निवडा आणि त्यासाठी मेहनत घ्या.
४) हातातील अस्त्र – लक्ष्याकडे अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न
अस्त्राप्रमाणे तुमच्याकडील शक्तीचा उपयोग करून समोरील अडथळे दूर करा व आपले ध्येय लक्ष्य गाठा. प्रामाणिक प्रयत्न केलेत तर काहीही जिंकता येते. मात्र जिद्द न हरता येणार्या अडथळ्यांवर तुमच्या सद्गुणांनी मात करा.
५) एकदंत – चांगल्या गोष्टीचा प्रसार करा, वाईट गोष्टी सोडून द्या.
तुमच्या बाबतीत झालेल्या चांगल्या-वाईट गोष्टींचा विचार करा. तुमच्या झालेल्या टीकेला सकारात्मकतेने घ्या. म्हणजे वाईट गोष्टी, अवगुण यांना बाहेर टाकून नव्या आणि चांगल्या गुणांना आत्मसात करा.
६) सोंड – परिस्थितीनुसार बदलांना तयार रहा
जीममध्ये न जाण्याची, व्यायाम टाळण्याची अनेक कारणं आपल्याकडे तयार असतात. मात्र असे करणे टाळा. संकंटांपासून पळणे टाळा. परिस्थितीनुसार बदल करायला शिका. अनेकदा आपण परिस्थिती नाकारताना अनेक कारणं देण्यास तयार असतो. हे टाळा.
७) उंदीर – लहानसे वाहन
गणेशाचे इटूकले वाहन उंदीर आहे. त्याचप्रमाणे आपल्या अवाजवी इच्छा-आकांक्षाही लहान ठेवा. तुम्ही डाएटवर असतानादेखील एक एक्स्ट्रा गुलाबजाम, केकचा तुकडा, सिगारेट पिण्याची इच्छा. अशा केवळ क्षणिक आनंद देणार्या गोष्टींवर नियंत्रण मिळवा.
८) लंबोदर- लहान-मोठ्या सार्या गोष्टी पचवण्याची क्षमता ठेवा
आयुष्य कधीच स्थिर नसते. त्यात चढ-उतार येतच राहणार. मग अशावेळी त्याचा स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा सत्य स्विकारायला शिका. तुम्ही स्वतःला जितका त्रास करून घ्याल तितक्या तुमच्या आरोग्यविषयक समस्या वाढत जातील.
९) छोटे तोंड – कमी बोला
कमीत कमी बोला आणि तो वेळ अधिकाधिक काम करण्यात गुंतवा. यामुळे तुमची कामं पटापट होतील. अचानक आलेले काम, किंवा जीवनात आलेले अडथळे पाहून थकून किंवा त्यांच्यावर टीका टिप्पणी करत न बसता ते पूर्ण कसे होईल याकडे लक्ष द्या.
Comments 1