रेल्वे स्टेशन ते बॉलीवूड एखाद्या चित्रपटाला शोभणारा प्रवास किंवा कथा अशी राणू मंडल यांच्या जीवनाची गोष्ट आहे. कधी कोणीही विचार केला नसेल कि एका रेल्वे स्टेशनवर भिक मागणाऱ्या महिलेला एवढी प्रसिद्धी मिळेल. एका प्रवाशाने व्हिडीओ शूट करून फेसबुकवर अपलोड केला आणि तो व्हिडीओ करोडो लोकांनी बघितला. आणि इथून सुरु झाली राणू मंडल यांचे नवीन जीवन.
राणूने आपल्या जीवनाची कथा सांगितली आहे ती पुढील प्रमाणे आहे, ६० वर्षा अगोदर रानुचा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला होता. काही कारणामुळे ती आपल्या आई वडिलापासून वेगळी झाली. त्यानंतर रानुने एका स्वयंपाकी सोबत लग्न केले तो प्रसिद्ध अभिनेता फिरोज खान यांच्या कडे कामाला होता. नवऱ्यासोबत राणू बंगाल सोडून मुंबईत आली पण इथून जीवनाने कलाटणी घेतली आणि कुटुंबात अनेक खटके उडू लागले.
रानाघाट रेलवे स्टेशनवर गाणे म्हणणारी राणू आज एक इंटरनेटवर वायरल असे व्यक्तिमत्व आहे. ती सांगते कि तिच्या जीवनावर एक चांगला चित्रपट बनू शकतो. ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणे काही दिवसा अगोदर रेल्वे स्टेशनवर म्हणणारी राणू प्रसिद्धी झोतात आली.
तिचे गाणे बॉलीवूड मधील अनेक दिग्गजांनी बघितले ज्या मध्ये एक हिमेश रेशमिया होते त्यांनी रानुला सिंगर म्हणून काम करायची संधी दिली. त्यांनी राणू सोबत रियलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर’ या कार्यक्रमात देखील रेकोर्डिंग केली.
ती सांगते कि तिचा जन्म फुटपाथवर झाला नाही ६ महिन्याची असताना तिचे आईवडील वेगळे झाले परंतु तिचा जन्म एका चांगल्या कुटुंबात झाला होता. तिच्या मोठ्या बहिणीने तिचे लहानाचे मोठे केले. ती सांगते कि तिला गाणे गायची आवड आहे ती काम म्हणून गाण्याकडे बघत नाही.
लता मंगेशकर यांचे गाणे कै सेट वर ऐकून ती गाणे म्हणायला शिकली असे ती सांगते. फिरोज खानच्या घरी कामाला असताना त्यांचे दिवस चांगले सुरु होते. तेव्हा फरदीन खान हा कॉलेज मध्ये होता. ती सांगते तेव्हा आम्ही जैकी श्रॉफ यांचा हिरो सिनेमा बघितला होता. सध्या ती आपल्या मुली सोबत आहे.
राणू सांगते कि तिला आता मुंबईत राहायला घर हवे परंतु त्याची चिंता नाही कारण देव आहे तो सर्वाचे भले करतो. सलमान ने तिला घर दिले या पासून तिने नकार दिला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.