भारतीय संघातील स्टार जोडी हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांना स्टायलिश क्रिकेटर म्हणून ओळखले जाते. हार्दिक पांड्या सध्या भारतीय संघातून बाहेर असून त्याला विश्वचषकानंतर विश्रांती देण्यात आली आहे. हार्दिकने विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. तर कृणाल पांड्याने नुकतेच वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या टी-२० स्पर्धेत चांगली कामगिरी केली.
हार्दिक पांड्या लवकरच भारतीय संघात परतेल अशी शक्यता आहे. पुढील महिन्यात आफ्रिका संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेत त्याची निवड होण्याची शक्यता आहे. भारतीय संघातून विश्रांती मिळाल्यानंतर पांड्या सुट्टीचा आनंद घेत असल्याचे एका व्हिडिओमधून समोर आले आहे.
हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्याने नुकतीच एक अलिशान लॅम्बॉर्गिनी गाडी विकत घेतली आहे. भगव्या रंगाची हि आलिशान गाडी घेऊन मुंबईच्या रस्त्यावर फेरफटका मटणाचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
आपल्या या गाडीतून हार्दिक आणि कृणाल यांनी नुकताच मुंबईच्या रस्त्यांवर फेरफटका मारला. वांद्रे येथे एका कामासाठी आलेले असताना, हार्दिकच्या या अलिशान गाडीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वांद्र्यात दोघांना या गाडीतून जिमला जाताना देखील बघितले गेले. हार्दिकने खरेदी केलेली हि कार खूप महागडी आहे.
खूप महागडी आहे कार-
हार्दिक आणि कुणालने खरेदी केलेली लॅम्बोर्गिनी कार एकदम हायटेक असून गाडीचे इंटेरिअर खूप आकर्षक आहे. हि कार कन्वर्टेबल असून यामध्ये दोघांना बसण्यासाठी सीट्स आहेत. या गाडीची किंमत हि ३-५ कोटी रुपये असल्याची माहिती आहे. या गाडीचे इंजिन ५१५ ते ५४४ किलोवॅट हॉर्सपॉवर आहे.
हि गाडी पेट्रोलवर चालणारी असून गाडीची इंधन क्षमता ९० लिटर आहे. तर या गाडीचे मायलेज ५-७ किमी प्रति लिटर आहे. हि कार भारतीय क्रिकेटपटूंनमध्ये असलेल्या गाड्यांमध्ये सर्वात महागडी आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीकडे असलेल्या कारची किंमत पाऊणे तीन कोटींच्या आसपास आहे.
तर भारताचा माजी कर्णधार आणि गाड्यांचा शौक असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीकडे असणाऱ्या जीपची किंमत १ कोटींच्या आसपास आहे. धोनीने जीपची ग्रैंड शेरोकी एसयूवी खरेदी केली होती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.