भारतीय रेल्वेची गणना जगातील सर्वात मोठ्या रेल्वेमध्ये केले जाते. “देशाची जीवनवाहिनी” असे तिचे ब्रीदवाक्य उगाच नाही. भारतीय रेल्वेच्या नुसत्या कर्मचाऱ्यांची संख्याच चीनच्या लष्करापेक्षा थोडीशी कमी आहे. तसेच रेल्वेसाठी स्वतंत्र बजेट असायचे यावरून तिची व्याप्ती लक्षात येईल.
रेल्वेचा हा सगळा व्याप उभा आहे तो प्रवाशांच्या पायावर ! दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सर्वात स्वस्त आणि सुरक्षित प्रवास मानला जातो. म्हणूनच आपल्या प्रवाशांसाठी रेल्वे दरवेळी काही ना काही भेट देत असते.
१ जानेवारीपासून यांना रेल्वे प्रवासात मिळतेय ४०% सवलत
भारतीय रेल्वे १ जानेवारी २०१९ पासून ट्रान्सजेंडर म्हणजेच तृतीयपंथी प्रवाशांना तिकिटामध्ये ४०% सवलत देत आहे. त्यासाठी तृतीयपंथी व्यक्तीचे वय ६० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवे.
त्यापूर्वीपासूनच रेल्वे ६० वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या पुरुषांना तिकिटात ४०% सवलत आणि ५८ वर्ष किंवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या महिलांना तिकिटात ५०% सवलत देत आहे. तृतीयपंथी लोकांना मात्र ही सवलत मिळत नव्हती. आता रेल्वेने त्यांचाही विचार करून त्यांना तिकिटात सवलत द्यायला सुरुवात केली आहे.
विद्यार्थी आणि कामगारांनाही रेल्वेकडून सवलत
भारतीय रेल्वे ५३ वेगवेगळ्या प्रकारात आपल्या प्रवाशांना तिकिटात सवलत देते. त्यामध्ये १०% पासून १००% पर्यंत सवलतीचा समावेश आहे. शैक्षणिक सहलीवर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणी आणि स्लीपर श्रेणीच्या डब्यांतून प्रवासासाठी रेल्वे ५०% सवलत देते.
अनुसूचित जमाती वर्गातील विद्यार्थ्यांना हीच सवलत ७५% पर्यंत आहे. त्यासोबतच ग्रामीण भागातील सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना अभ्यास सहलीसाठी द्वितीय श्रेणी डब्यात ७५% सवलत दिली जाते. याशिवाय दररोज कामानिमित्त ये जा करणाऱ्या कामगार प्रवाशांनाही रेल्वेकडून सवलत मिळते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.