बॉलिवूड एक्ट्रेक्स शिल्पा शेट्टी आरोग्याच्या बाबतीत खूप जागरूक आहे. ती स्वतः तर फिट राहतेच पण त्यासोबतच लोकांनीही फिट राहावे यासाठी योगा, एरोबिक्स सारख्या वेगवेगळ्या माध्यमातून कार्यरत असते.
तिच्या याच विचारांमुळे तिने काही दिवसांपूर्वी तिला आलेल्या एका जाहिरातीच्या १० कोटींच्या ऑफरला नकार दिला आहे. १० कोटी म्हणजे छोटी रक्कम नाही, पण एवढी मोठी ऑफर नाकारण्यामागे कारणही तसेच होते. पाहूया काय आहे हे प्रकरण…
तत्वांशी तडजोड नाही : शिल्पा शेट्टी
बॉलिवूड जगतातील बातम्यांनुसार एका कंपनीने शिल्पा शेट्टीला आयुर्वेदिक स्लिमिंग पील्स म्हणजेच आयुर्वेदिक पद्धतीने सडपातळ होण्याचा दावा करणाऱ्या गोळ्यांचे प्रमोशन करण्यासाठी विचारले होते. त्यासाठी ती कंपनी शिल्पा शेट्टीला १० कोटी रुपये द्यायलाही तयार होती. पण शिल्पाने ही ऑफर ठोकरली.
यावर बोलताना तिने सांगितले की, “मी असे काही विकू शकत नाही ज्यावर मला विश्वास नाही. स्लीपिंग पील्स आणि फॅट डायट तुम्हाला आकर्षित करतात, कारण त्याने त्वरित परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आलेला असतो. परंतु आपल्या ठराविक रुटीनचे पालन करणे आणि हेल्दी अन्न खाल्ल्याने जो परिणाम हाती येतो त्याला कशाचीही तोड नाही.”
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी केले शिल्पाचे कौतुक
शिल्पा शेट्टीने तिच्या विचारांना साजेसा निर्णय घेतला खरा, पण तिच्या या निर्णयाचे चांगलेच कौतुक होत आहे. सोशल मीडियावर शिल्पाचे फॅन्स तिच्या या निर्णयाबद्दल भरभरून लिहीत आहेत.
एवढेच नाही तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराजसिंह चौहान यांनीही ट्विटरवर ट्विट करून तिच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. ते म्हणतात की, “समाजाच्या दृष्टीने सेलेब्रिटी लोकांचीसुद्धा जबाबदारी असते, जी शिल्पा शेट्टी चांगलीच पार पाडत आहे. तिचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. मी तिचे अभिनंदन करतो.”
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.