कंडोम हा शब्द भारतात तसा सार्वजनिक ठिकाणी बोलायला लोक मागे पुढे पाहतात. त्याविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. आम्ही देखील थोडा हातभार याला लावणार आहो. पहिले टीव्हीवर येणारे प्यार हुवा इकरार हुवा हे गाणे आणि त्यानंतर येणारी कंडोमची जाहिरात अनेकांच्या डोक्यावरून जात होती. आज थोडा हातभार आम्ही देखील लावणार आहेत.
कंडोम विषयी काही खासरे तथ्य आज आपण बघूया
कंडोम एड्स तसेच अनेक लैंगीक आजारापासून आपला बचाव करतो परंतु तरीही पुरुष कंडोम वापरण्यास मागेपुढे पाहतात. त्याचे कारण कि समाजात याविषयी काही गैरसमज पसरलेले आहेत.
फक्त ५% पुरुष वापरतात कंडोम भारतातील फक्त ५ % पुरुषच कंडोम वापरतात.
कंडोम मध्ये येणारे प्रकार
बहुतांश कंडोम हे लेटेक्स पासून बनतात. जर एखाद्यास लेटेक्सची एलर्जी असेल तर कंडोम नॉन लेटेक्स हि मिळतात. हे कंडोम Polyurethane पासून बनतात. काही कंडोम Polyisoprene पासून देखील बनतात. या शिवाय काही कंडोम हे मेंढीच्या पिलाच्या चामड्यापासून देखील बनतात. हे कंडोम हे मेंढीच्या आतड्यापासून बनतात.
सेक्स वर इफेक्ट करत नाही
काही लोकांना वाटते कि कंडोम वापरले नाहीतर सेक्स मध्ये जास्त मजा येतो परंतु असे काहीही नाही आहे. कंडोमचा उपयोग करा अथवा नाही केला तरी यामध्ये फरक नाही आहे.
४०% कंडोम महीला खरेदी करतात. काही केलेल्या सर्वेक्षणा नुसार ४०% महिला कंडोम खरेदी करतात. झालेना हैराण परंतु हे सत्य आहे.
जगातील सर्वात मोठा कंडोम
जगातील सर्वात मोठा कंडोम हे TheyFit हा आहे. आणि हा 240mm लांब आणि 69mm रुंद एवढा आहे. सामान्य कंडोम पेक्षा याची साईज खूप मोठी आहे.
इजिप्त निवासी आणि कंडोम
लेटेक्स कंडोमच्या अगोदर जनावराच्या मूत्राशयापासून बनविलेले कंडोम वापरल्या जात होते. इजिप्त मधील लोक पुरातन काळात फिश स्कीन, लेनिन व सिल्क म्हणजेच रेशम यापासून बनविलेले कंडोम देखील वापरत होते.
कंडोम मध्ये इलेक्ट्रिक shock
हेडिंग वाचून थोडे वेगळे वाटले असेल परंतु कंडोम जेव्हा बनविल्या जाते तेव्हा त्यामध्ये इलेक्ट्रिक shock सोडला जातो त्यामुळे कंडोम कुठे फाटून आहे का हे समजते.
कंडोमचे आयुष्य
एक कंडोम जर सुरक्षित थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवले तर तब्बल ४ वर्षापर्यंत ते सुरक्षित राहते आणि खराब होत नाही. फक्त ज्या ठिकाणी हे कंडोम आपण ठेवतो ते ठिकाण थंडे आणि कोरडे असले पाहिजे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा. समाजात जागरूकता पोहचवणे आपले काम आहे आम्ही माहिती पोहचवली आता आपले काम हि माहिती सर्वत्र पोहचवणे आहे. माहिती आवडल्यास आमचे पेज अवश्य लाईक आणि शेअर करा.