आर आर आबा महाराष्ट्राचे सर्वात लाडके आणि कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री होते. आयुष्यातील शेवटच्या दिवसात त्यांना फार बोलता येत नसे परंतु ते चिठ्ठीवर लिहून आपल्या जवळील लोकाच्या नेहमी सम्पर्कात राहिले. यावरून तुम्हाला अंदाज येईलच कि आबांना किती जनतेविषयी कळवळा होता. शेवट पर्यंत ते समस्या सोडविण्याकरिता अग्रणी होते.
आज आपण अशीच एक आबाची आठवण बघूया शेवटच्या दिवसात त्यांनी स्मिता दीदींना दिलेला शब्द बघूया..आर आर आबांची एक सवय होती. ते कोणत्याही भागात गेले तर त्यांच्या गावची अंजनीची सासुरवासिन त्या गावाच्या आसपास असेल तर आबा हमखास जायचे आपल्या बहिणीच्या भेटीला. अगदी ते जिल्हा परिषद सदस्य होते तेव्हापासून ते आमदार, मंत्री झाल्यावरही ते आपल्या गावच्या लेकीची भेट घ्यायची चुकवत नसत.
अनेकदा असं व्हायचं आबा त्या गावाला अगोदर येवून गेलेले असायचे. कधी तेच सांगायचे अमुक गावात मारुतीच्या देवळासमोर चला. तिथ जायचं आहे माझ्या बहिणीकड. त्यांचीस्मरणशक्ती पाहून थक्क होणार्या सोबत्यांना ते सांगायचे ,”स्कूटरवरून आलो होतो बाबा म्हणून रस्ता लक्षात आहे” हा दौराअचानक असायचा.
आले आबांच्या मना तिथे कोणाचेचालेना, असा प्रकार असायचा. आमच्या गावच्या बबूमावशी गिरीगोसावी यांच्या घरी आले होते आबा असेच एकदा.लीलावती मध्ये आबांना अनेक लोक भेटायला येत होते. हॉस्पिटल रेकॉर्ड नुसार आबांना रोज ८०० ते ९०० लोक भेटायला येत असे. एवढ्या लोकांना चहा पोहचवणे शक्य नव्हते परंतु परंतु आबांनी स्मिता दीदीस लिहून दिले कि सर्वाना चहा दे!
स्मिता दीदींना एवढा चहा रोज पुरविणे शक्य नव्हते तरी आबांनी आग्रह केला आणि लिहून दिले कि ” दुरून आली आहे लोक हे सर्व आपली माणस आहेत स्मिता तुला विनंती करतो कि प्रत्येक व्यक्तीला आलेल्या चहा दे” हे शब्द वाचून अंगावर काटा येतो कि जो व्यक्ती मरणाच्या दारात उभा आहे तरी शेवटपर्यंत आपल्या लोकांचा विचार करतो.
आबांनी अनेक वेळा परिवाराला गोष्टी कळू नये म्हणून लपवून ठेवल्या आपली बिमारी सुध्दा त्यांना परिवाराला व लोकांना धक्का द्यायचानव्हता. त्यांनी स्मिता दीदी जवळ खंत देखील लिहून व्यक्त केले कि त्यांना प्रत्येकाला बोलता येत नाही. आबांनी शेवटचा शब्द लिहून दिलेला आई हा आहे. त्याच काळात दुसऱ्या मुलीचा वाढदिवस होता तिला सुध्दा शुभेच्छा लिहून दिल्या.हे सर्व शब्द हृदयास छेद पाडणारी आहेत.
परंतु आबांनी शेवटपर्यंत जनतेचा विचार केलाहि गोष्ट मन हलवून जाते. आबांनी शेवटच्या श्वासापर्यंत जनतेची सेवा केली आणि माणसांची काळजी घेतली हे विशेष आहे. आबाचा कधिही आबासाहेब नाही झाला यावरुन त्यांचा स्वभाव आपल्या ध्यानात येईल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.