आदरणीय गृहमंत्री श्री अमित शाह
नॉर्थ ब्लॉक,
नवी दिल्ली, ११०००१
सर,
आम्हाला नजरकैदेत ठेवल्यासंबंधी माहिती मिळ्वण्याबाबत मी आजपर्यंत अनेक अयशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता माझ्याकडे तुम्हाला पत्र लिहिण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. मला आशा आहे आणि मी प्रार्थना करते कि मी माझ्या मूलभूत अधिकारांविषयी जे प्रश्न उपस्थित केले आहेत त्याबद्दल मला अटक केली जाणार नाही.
काश्मीर सध्या अंधारात आहे आणि मला काश्मीरमधील लोक तसेच जे लोक याबद्दल आवाज उठवित आहेत त्यांच्या सुरक्षेची चिंता आहे. ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर आम्ही काश्मिरी हतबल आणि अस्वस्थ झालो आहोत. माझी आई आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्यासह इतर अनेक प्रमुख लोकप्रतिनिधींना त्याच दिवशी अटक करण्यात आली.
कर्फ्यू लागून आता दहा दिवसांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. घाटीमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे कारण सर्व संपर्काचे साधने बंद आहेत. त्यामुळे लोक निराश झाले आहेत. आज देशात स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना काश्मिरींना मात्र जनावरांप्रमाणे पिंजऱ्यात ठेवले जात आहे आणि त्यांचे आवश्यक मानवी हक्कही नाकारले जात आहेत.
दुर्दैवाने मलासुद्धा माझ्या घरात नजरकैदेत ठेवले गेले आहे, ज्याचे कारण तुम्हाला चांगले माहित आहे. आम्हाला भेटायला परवानगी नसल्यामुळे आम्हाला भेटायला येणाऱ्या लोकांना कधी गेटवरुन पळवून लावले जाते हे आम्हाला माहित सुद्धा होत नाही. मी कोणत्याही पक्षाशी जोडलेली नसताना आणि नेहमीच कायदा मानणारी एक नागरिक असताना देखील माझ्यासोबत हे सर्व होत आहे.
सुरक्षा दलांनी अनेक पोर्टल आणि वर्तमानपत्रांना मी दिलेल्या मुलाखती हे माझ्या अटकेचे कारण असल्याचे सांगितले आहे. मी पुन्हा काही बोलली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही मला देण्यात आली आहे.
आपणास सांगू इच्छिते कि मी सर्व मुलाखतीत फक्त कलम ३७० हटवणे कसे असंवैधानिक होते आणि त्यानंतर लागलेला कर्फ्यू कसा चुकीचा आहे. मी माझ्या आईच्या सुरक्षेविषयी देखील चिंता व्यक्त केली आहे. जी दुसऱ्या शेकडो नेत्यांसोबत ५ ऑगस्ट पासून जेरबंद आहे.
काश्मिरींचा दबलेला आवाज उठवण्यामुळे मला हि शिक्षा का देण्यात येत आहे हे मला समजत नाहीये. एखाद्याला होत असलेला त्रास, एखाद्याच दुःख, एखाद्याचा अपमान व्यक्त करणे गुन्हा आहे का? ज्यासाठी मला त्रास देत आहात. मला नजरकैदेत का ठेवण्यात आले आहे आणि कधीपर्यंत ठेवण्यात येणार आहे यावर थोडा प्रकाश टाकला तर खूप उपकार होतील. मला कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल का?
माझ्यासोबत होत असलेली हि वागणूक अत्यंत द्वेषातून आणि अपमान करणारी आहे. मला माझ्या मुलाची आजीसोबत भेट करून देण्यासाठी विनंत्या कराव्या लागत आहेत. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत नागरिकाला त्याच्यावर सुरु असलेल्या दडपशाहीविरूद्ध आवाज उठवण्याचा अधिकार नाही काय? सत्यमेव जयते यांचा घोषवाक्य आपल्या देशाचे आणि घटनेचे मूलभूत तत्व आहे. मला सत्य सांगण्यासाठी एखाद्या गुन्हेगारासारखी वागणूक का देण्यात येत आहे.
हे पत्र तुम्हाला न पाठविल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते, कारण तुम्हाला माहिती आहे की जम्मू-काश्मीरमध्ये टपाल सेवा बंद आहे.
सत्याचा विजय होईल.
शुभेच्छा!
इल्तिजा मुफ्ती
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.