हज हे मुस्लिम लोकांच्या आयुष्यातील ते एक महत्वाचे कार्य आहे. इस्लामच्या पाच सिद्धांतांमध्ये त्याला स्थान आहे. प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने आयुष्यात एकदा तरी हज यात्रा करायला हवी अशी मुस्लिम धर्मातील एक मान्यता आहे. मक्का या अरबांच्या पवित्र स्थळाच्या ठिकाणी असणाऱ्या काबा या अल्लाहच्या घरास म्हणजेच इथल्या मशिदीच्या मध्यभागी असणाऱ्या घरवजा इमारतीस प्रदक्षिणा घातल्यानंतरच हज पूर्ण होतो अशी मुस्लिमांची धार्मिक मान्यता आहे. दरवर्षी जगभरातील लाखो मुस्लिम आपला हज पूर्ण करण्यासाठी इथे येतात. हज पूर्ण करण्यासाठी पाच दिवस लागतात.
हजची महत्वाची रस्म कुर्बानी
हज यात्रेदरम्यान हजच्या अनेक रस्म पूर्ण कराव्या लागतात. त्यातलीच एक रस्म म्हणजे कुर्बानी ! हज तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा अल्लाहची प्रार्थना केल्यानंतर तिथे येणारा मुस्लिम कुठल्यातरी जनावराची कुर्बानी देतो. हजला येणाऱ्या प्रत्येक हाजीला हे करावे लागते.
कुर्बानीत जी जनावरे कापली जातात त्यात प्रामुख्याने बकरा, मेंढ्या आणि उंट यांचा समावेश असतो. ज्या दिवशी ही कुर्बानी दिली जाते, तो दिवस ईद-उल-अजहा म्हणजेच बकरी ईद म्हणून साजरा केला जातो. २०१६ मध्ये १५ लाख हाजी हज यात्रेला आले होते, मग किती जनावरांची कुर्बानी दिली असेल तुम्हीच विचार करा.
कुठून येतात कुर्बानीसाठी एवढी जनावरे ?
मक्काच्या ठिकाणी लाखोंच्या प्रमाणात कुर्बानी दिली जाणारी जनावरे दरवर्षी येतात तरी कुठून हा प्रश्न आपल्याला पडला असेल. सौदी अरेबिया ही जनावरे आयात करते. सर्वाधिक बकरे पूर्व आफ्रिकेच्या सोमालीलँड येथून येतात.
त्यांची संख्या जवळपास १० लाख असते. मोठ्या जहाजांमधून त्यांची आयात केली जाते. सोमालीलँड इथल्या लोकांचा पशुपालन हा प्रमुख व्यवसाय आहे. यातली काही जनावरे उरुग्वे, पाकिस्तान, तुर्की, सोमालिया अशा देशांमधूनही आयात केली जातात.
इतक्या जनावरांची कुर्बानी दिल्यानंतर त्या मांसाचे करतात तरी काय ?
शरियत कायद्यानुसार ज्या जनावराची कुर्बानी दिली जाते, त्याचे मांस तीन हिश्श्यात विभागले जाते. त्यातले दोन हिस्से मांस गरिबांना वाटले जाते, तर राहिलेला एक हिस्सा कुर्बानी करणारा खाऊ शकतो. पण हजला गेलेला व्यक्ती ना स्वतः एक हिस्सा खाऊ शकतो, ना तिथल्या गरिबांना दोन हिस्से वाटू शकतो.
अशामध्ये तिथे मोठ्या प्रमाणावर मांस गोळा होते. हजला ४० डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान असल्याने ते मांस खराब व्हायचे. म्हणून पूर्वी ते मांस जमिनीत गाढले जायचे. पण आता ते मांस योग्य ठिकाणी पोचवायची व्यवस्था झाली आहे. त्यामुळे हजला ना मांस शिल्लक राहते, ना घाण पसरते ना रक्तच रक्त दिसते.
कुर्बानीनंतर इथे जाते मांस
सौदी अरेबिया सरकारने यावर एक उपाय शोधला आहे. ३६ वर्षांपूर्वी त्यांनी “युटिलायजेशन ऑफ हज मीट” प्रोजेक्ट लाँच केला होता. त्यानुसार कुर्बानी नंतर गोळा झालेलं मांस अशा देशांमध्ये पाठवले जाते, जिथे गरीब मुस्लिम लोक राहतात. २०१२ मध्ये जवळपास १० लाख जनावरांची कुर्बानी देण्यात आली होती, त्यांचे मांस २४ देशांमध्ये पाठवण्यात आले होते. २०१३ साली सौदी अरेबियाने सीरिया २८ देशात मांस पाठवले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.