आपण मेडिकलमधून औषधे आणताना पाहिले असेल की औषधाच्या पाकिटात असणाऱ्या टॅब्लेटच्या बाजूलाच त्याच आकाराच्या जागा असतात. पण त्यात काहीच नसते, त्या मोकळ्याच असतात. जर या मोकळ्या जागांमध्ये काहीच नसते, तर मग औषधांच्या पाकिटावर त्या असण्यामागचे कारण काय असा विचार आपल्या मनात नक्की आला असेल.
आज आम्ही या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया या मागचे खरे कारण…
या कारणासाठी असतात औषधांच्या पाकिटावर मोकळ्या जागा
खरं पाहता औषधाच्या पाकिटावर मोकळ्या जागा करण्यामागे वेगवेगळी कारणे असतात. असे केल्याने एकतर औषधे एकमेकांत मिसळत नाहीत आणि त्यांच्यात कोणती रासायनिक अभिक्रियाही होत नाही. तसेच औषधांच्या रक्षणासाठीही त्यांचा एकप्रकारे उपयोगच होतो.
औषधांची ने आण करताना त्यांना कसले नुकसान होऊ नये म्हणून त्यांची काळजी घ्यावी लागते, त्यासाठीही मोकळ्या जागा केल्या जातात. या मोकळ्या जागा औषधांच्या पाकिटासाठी थोडक्यात कुशन्स सारखे काम करतात, त्यामुळे औषधांवर दाब पडून औषधे खराब होत नाहीत.
ही सुद्धा कारणे असू शकतात
कधी कधी औषधाची मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी दिनांक, त्यातले घटक, औषधासंबंधी सूचना, औषध घेण्याची पद्धत इत्यादि महत्वाची माहिती रुग्णांना देण्यासाठी जास्त जागेची गरज असते.
पाकिटावरचा प्रिंटिंग मजकूर जास्त असल्याने तो मजकूर बसण्यासाठी पाकिटाचा आकार वाढावा आणि आकार वाढल्याने पाकिटातील गोळी सुरक्षित राहावी म्हणूनही पाकिटातील टॅब्लेटच्या बाजूला मोकळ्या जागा बनवल्या जातात. ही माहिती वाचल्यानांतर आता आपल्याला पुन्हा असा प्रश्न कधी पडणार नाही.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.