मायानगरी मुंबई ! लोकांच्या स्वप्नातले शहर ! खरं तर एखाद्या शहरातील इमारती किंवा रस्ते त्या शहराला स्वप्नाचे शहर बनवत नाहीत. तर तिथले लोक बनवतात. चहा विकणाऱ्यापासून मॅगडोनाल्डपर्यंत, रिक्षा चालवणाऱ्यांपासून मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्यांपर्यंत सर्वजण ! हेच तर खरे शहर असते.
अंगावर चपराशाची वर्दी असो नाहीतर पोलिसांची; प्रत्येकजण आपापले कर्तव्य पार पाडत असतो. माणुसकी जपत असतानाच आपले कर्तव्य पार पाडल्याचा प्रसंग मुंबईत बघायला मिळाला आहे.
आधी बुडताना वाचवलं..
मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर निलेश जाधव नावाचे पोलीस कॉन्स्टेबल पेट्रोलिंग करत असताना अचानक त्यांच्या वायरलेसवर एक बातमी धडकली. वर्सोवा किनाऱ्यावर एक माणूस समुद्रात बुडत आहे. निलेश जाधव त्वरित किनाऱ्यावर पोहोचले.
कुठल्याही मदतीची प्रतीक्षा न करता त्यांनी सरळ पाण्यात उडी घेतली. पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला त्यांनी बुडण्यापासून वाचवले आणि बाहेर काढले. रिशू चोपडा असे त्या बुडणाऱ्या व्यक्तीचे नाव असून तो आपल्या मित्रांसोबत पहिल्यांदा गुडगाव वरून मुंबईला आला होता.
मग नियम मोडल्याने दंड आकारला…
निलेश जाधव यांनी रिशू चोपडाला बुडताना वाचवून आपला माणुसकी धर्म जपला. त्यांनतर दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेले. मरणाच्या दारातून वाचलो म्हणून कुणाला आनंद होणार नाही. रिशू चोपडानेही दारू पिऊन आपला आनंद साजरा केला. त्या नशेत मित्रांसोबत तो मुंबई फिरायला निघाला. त्यांच्या गाडीची ओव्हरस्पिड बघून पोलिसांनी त्यांची गाडी पकडली.
योगायोग असा की ज्याने गाडी पकडली ते निलेश जाधवच समोर उभे होते. दारूच्या नशेत ओव्हरस्पीडने गाडी चालऊन नियम मोडल्याबद्दल त्यांनी रिशू चोपडाला दंड केला. एकाच दिवसात त्यांनी बुडताना आणि अपघात होण्यापासून रिशू चोपडाचा जीव वाचवला. स्वप्नाच्या शहरात असे कित्येक प्रसंग दररोज घडत असतात.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.