विलासराव देशमुख यांचं नाव घेतलं कि समोर येतो हसतमुख चेहरा, उमदे व्यक्तिमत्व, संयमी स्वभाव, धूर्त व मुरब्बी बाणा, हजरजबाबीपणा, आक्रमक वृत्ती, राजकीय परिपक्वता, राज्याच्या प्रश्नांची उत्तम जाण आणि प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्य. त्यांच्या या गुणांमुळेच त्यांच्याभोवती नेहमीच लोकप्रियतेचे वलय राहिले.
खासरेवर बघूया राजकारणातील राजहंस म्हणून परिचित असलेल्या विलासराव यांच्या बद्दल काही खासरे माहिती..
विलास दगडोजीराव देशमुख जन्म २६ मे १९४५ रोजी मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील बाभूळगाव या छोट्याशा खेड्यात झाला. पुणे विद्यापीठातून बीएससीचे उच्च शिक्षण घेतलं आणि नंतर कायद्याची पदवी घेतली. त्यांची आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची मैत्री सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. ते कॉलेज जीवनापासून खूप खास मित्र होते.
३५ वर्षांंतील राजकीय प्रवासातून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला होता. तीन विषयात पदवी असलेले विलासराव देशमुख हे वयाच्या २९ व्या वर्षी बाभळगावचे (लातूर) सरपंच झाले. तिथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. सरपंचपदापासून सुरु झालेला राजकीय झंजावात पुढे युवक काँग्रेसचे नेते, तेव्हाच्या एकत्रित उस्मानाबाद बँकेचे संचालक, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य असे करीत करीत ते इ.स. १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेवर निवडून जात आमदार बनण्यापर्यंत पोहचला.
आमदार झाल्यानंतर मंत्री होणे तसे सोपं नसते पण आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या दोन वर्षात विलासरावांना मंत्रिपद मिळाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. पुढे ते दोन वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रात अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम खात्याचे केंद्रीय मंत्री झाले.
इ.स. १९९५ साली शिवाजीराव कव्हेकर यांनी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव केला. हा त्यांच्या कारकीर्दीतला सर्वात मोठा हादरा होता. त्यांनी काँग्रेसच्या बाहेर पडून शिवसेना भाजपच्या मतदीने विधान परिषद लढवण्याचा मोठा निर्णय घेतला. थोडक्यात झालेल्या पराभवाने त्यांना राजकीय वनवास त्यावेळी भोगावा लागला.
पुढे १९९९ च्या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर त्यांची मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली. विलासरावांनी १९९९ ते २००३ आणि नंतर २००४ ते २००९ अशी दोन टर्म्समध्ये आठ वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहण्याचा मान मिळवला.
विशेष हे कितीही कामात विलासराव देशमुख हे त्यांना आलेले फोन स्वतः उचलायचे. परिवाराने अनेक वेळेस विलासरावांना विनंती केली कि आमच्या करिता खाजगी नंबर ठेवा परंतु त्यांनी साफ इन्कार दिला होता. त्यांना कला,संगीत,नृत्य,नाटक आणि सिनेमा या विषयात खास रुची होती.
Manjara Charitable Trust ची स्थापना त्यांनी केलेली. या ट्रस्टची मुंबई मध्ये अनेक महाविद्यालये आहेत. मराठवाडा मित्र मंडळाची सुध्दा त्यांनीच स्थापन केलेले आहे. उस्मानाबाद युवक कॉंग्रेस असताना त्यांनी पाच सूत्री कार्यक्रम पक्षाला सुचविला. २००९ मध्ये सत्ता आल्यास आम्ही कर्जमाफी देऊ हा मुद्दा विलासरावांनीच सुचविला यावरून त्यांची चाणाक्ष बुद्धिमत्ता लक्षात येते.
२६/११ ला मुंबईत झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर ताजची पाहणी करण्यासाठी ते मुलाला व राम गोपाल वर्मा या दिग्दर्शकाला ताजमध्ये घेऊन गेले.होते त्यानंतर त्यांच्यावर खूप टीका झाली. त्यामुळे त्यांना मुखमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. पण सहाच महिन्यात ते दिल्लीत केंद्रीय मंत्री बनले.
१४ ऑगस्ट २०१२ रोजी दुपारी ०१:३० मिनिटांनी त्यांचा यकृताच्या आजाराने चेन्नईतील ग्लोबल हॉस्पिटल येथे निधन झाले. चेन्नइला त्यांचे लिवर ट्रान्सप्लांट करण्याकरिता नेण्यात आले परंतु होते परंतु ज्याचे लिवर द्यायचे होते तो व्यक्ती १ दिवसा अगोदर वारला. त्यांच्यावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजकारणातील राजहंस म्हणून महाराष्ट्राला परिचित असलेल्या विलासरावांचा आज स्मृतिदिन. खासरेकडून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.