काल १२ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सामील झालेला मॅन वर्सेज वाइल्ड शोचे प्रसारण झाले. मागील अनेक दिवसांपासून या प्रोग्रॅमच्या चर्चा सुरु होत्या. जगभरात प्रसिद्ध असलेल्या या शो मध्ये मोदी देखील सामील झाले होते. काल डिस्कव्हरी चॅनेलवर या शोचे प्रसारण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बेअर ग्रिल्स हे जवळपास १ तास उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये भटकंती करत होते.
या शोमध्ये मोदींनी अनेक गोष्टीबद्दल माहिती सांगितली. पंतप्रधान मोदींनी आपल्याबद्दल माहिती दिली तर बेअर ग्रिल्सने त्याच्या गोष्टी सांगितल्या. या शोमध्ये बोलताना मोदींनी निसर्गाची खूप स्तुती केली. त्यांनी सांगितलं कि त्यांना लहापणीपासूनच निसर्गाशी खूप लगाव होता. मोदींनाच नाही तर त्यांच्या वडिलांना देखील निसर्गावर खूप प्रेम होते.
त्यांच्या गावात साधा पाऊस जरी पडला तरी नरेंद्र मोदी यांचे वडील पत्र लिहून आपल्या नातेवाईकांना सांगायचे कि गावात खूप चांगला पाऊस पडला आहे. मोदींनी आपल्या लहानपणी पासून ते मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान झाल्यानंतर जी एक सुट्टी घेतली असेल तर तो या शोच्या शूटिंगचा दिवस असल्याचे म्हंटले आहे.
म्हणजेच मागील १८ वर्षात फक्त एक सुट्टी घेतली असल्याचे त्यांनी शोमध्ये बोलताना सांगितले. पंतप्रधान मोदी कधी सुट्टी घेतात याविषयी अनेकदा चर्चा झाल्या आहेत. मोदी नेहमीच आपल्या भाषणात सांगतात कि ते १८-१८ तास काम करतात. त्यांनी मागील १८ वर्षात कधीच सुट्टी देखील घेतली नाही. पण या शोमध्ये त्यांनी या शूटिंगला पहिली सुट्टी घेतल्याचं सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा हा विशेष शो सोमवारी १६४ देशांमध्ये दाखवला गेला. या शोचे शूटिंग ज्या जंगलात झाले तिथे शाकाहारी जेवण उपलब्ध करणे कठीण काम होते पण नरेंद्र मोदींनी त्यांच्या वेळ हा फक्त लिंबू पाणी पिऊन घालवला. मोदींनी आपल्या सोबत गरम पाणी आणि लिंबू पाणी आणले होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.