सांगली कोल्हापूरला प्रचंड महापुराने हादरून सोडले. पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या महाप्रलयंकारी महापुराचे पाणी घरात घुसल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. महापुरात अडकल्यानंतर लोकांनी बाहेर पाडण्यासाठी धडपड चालू केली होती. बचावकार्यात अनेक अडथळे होते. तर कुठे मदत वेळेत पोहचली नाही. त्यामुळे लोकांनी जसे जमेल तसे बाहेर पडण्याचा प्रयत्न चालू केला.
सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळच्या लोकांनी जीव मुठीत घेऊन गाव सोडले. जीव वाचावा म्हणून ते बोटीतून निघाले; मात्र काळाने बोटीतच त्यांच्यावर घाला घातला. महापुरातून सुटकेचे अंतर अवघ्या वीस मीटरवर असताना बोट बुडाली आणि तब्बल १७ लोकांना जलसमाधी मिळाली. तर पंधरा जणांना वाचवण्यात यश आले. या घटनेने जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला.
प्रशासनाकडून मदत येईपर्यंत बुडून जावू, या भीतीने लोकांना ग्रासले. त्यांनी ग्रामपंचायतीच्या बोटीतून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यांनी यासाठी वापरलेली बोट जुनी आणि लाकडी होती. त्या बोटीची १७ जणांना नेण्याची क्षमता असताना त्यामध्ये तब्बल तीस लोक बसले. ज्या नियोजित जागी ते खाली उतरणार होते तेथून अवघ्या वीस मीटर अंतरावरच मोटारबोटीचा काही भाग काटेरी झुडपात अडकला. त्यामुळे लोक घाबरले. महिलांची हालचाल झाली आणि क्षणात बोट पलटी झाली.
या बोटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बोट भरली तेव्हाच ती ओव्हरलोड झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.