महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा या जिल्ह्याना महापुराचा चांगलाच फटका बसला आहे. या महापुराने मागील ८ दिवसात थैमान घातले असून अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. या महापुराचा फटका मुक्या जनावरांना देखील बसला आहे. अनेक गायी म्हशी महापुरात वाहून गेले आहेत.
शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शहरातील दुकानांमध्ये अजूनही पाणी असल्याने नुकसानीचा आकडा अजूनही समोर आलेला नाहीये. सांगली कोल्हापूरमधील महापूर आता ओसरायला सुरुवात झाली आहे. महापुरातून लोकांना काढतानाचे जवानांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.
सैनिकांनी माणसांनाच नाही तर बऱ्याच ठिकाणी मुक्या प्राण्यांना देखील पाण्यातून काढल्याचे दिसले. हा महापूर फक्त महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटक, गुजरात आणि गोवा या राज्यात देखील आला आहे. या राज्यांमध्ये देखील मोठं नुकसान झालं आहे. लाखो जण महापुरात अडकून पडले होते.
सध्या सोशल मीडियावर एका पोलिसाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो दोन चिमुकल्या मुलींना आपल्या खांद्यावर घेऊन पाण्यातून चालत आहे. त्याच्या धैर्याला खरोखरच सलाम आहे. हा व्हिडीओ गुजरातचा आहे. गुजरातमधील महापुरात मोरबी पोलीस स्टेशनचे कॉन्स्ट्रेबल पृथ्वीराज जडेजा यांनी पुराच्या पाण्यातून दोन मुलींना वाचवलं आहे.
गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मोरबा परिसरातील पुराच्या पाण्यात काही कुटुंबं अडकल्याची माहिती मिळाली. त्यात दोन मुली अडकल्या होत्या. चहूबाजूंनी पुराचं पाणी होतं तरीही जीव धोक्यात घालून जडेजा यांनी अडकलेल्या दोन्ही चिमुकल्या मुलींना खांद्यावर घेतलं. तशाच अवस्थेत पुरातून त्यांना सुखरूप बाहेर काढलं.
जडेजा यांच्या धैर्यानं खाकी वर्दीचा सन्मान वाढला आहे. काही तासातच हा व्हिडिओ देशभरात व्हायरल झाला. व्हिडिओ पाहाणारा प्रत्येकजण या हिरोला सॅल्यूट ठोकतोय.
बघा व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.