महाराष्ट्र राज्यातील सांगली,सातारा, कोल्हापुर सह अन्य भागात यावर्षी झालेल्या मूसळधार पावसाने पुरस्थिती निर्माण झाली आहे.सध्या महापुरामुळे उघड़यावर पडलेल्या लोकांना माणूस म्हणून एक हात मदतीचा माणूसकीसाठी देऊन सहकार्य करावे.
सध्या स्थितिला या पूरग्रस्त बांधवाना त्यांचे संसार उभे करण्यासाठी त्याना मदत म्हणून आपण त्यांच्या सोबत उभा रहाणे आवश्यक आहे. कष्टकरी, शेतकरी,ड्राइवर, हमाल, असंघटीत कामगार यांना कपडे, संसार उपयोगी धान्य, औषधे,शेतीसाठी आवश्यक बियाणे व इतर साहीत्य आणि मुलांचे शैक्षणीक साहित्य देऊन त्यांचे दुख निवारण करुण या संकट काळी त्यांच्या दुःखांत सहभागी होऊन त्यांच्या जगण्याचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न म्हणून सढळ हाताने मदत करावी.
आपली छोटीशी मदत एखाद्या व्यक्तीचा संसार पुन्हा उभा करू शकते. मदत करणाऱ्यांनी शक्यतो नाशवंत वस्तू देऊ नका. पूरपरिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थित लागणाऱ्या गोष्टी मिळतील असे बघा. औषधी, घरघुती किराणा, लहान मुलांपासून वयस्कर लोकांचे स्वच्छ कपडे, इतर दैनंदिन वस्तू अशा गोष्टी लागणार आहेत. मदत करणाऱ्यांनी शक्यतो थेट गरजू लोकांना मदत मिळेल अशा पद्धतीने वितरण करा.
ठाणे , मुंबई , पुणे , धुळे या भागातून लोकांनी मदत सामग्रीचं कलेक्शन चालू केलेलं आहे , तुम्ही सुद्धा आपापल्या शहरातून मदत सामग्री गोळा करायला चालू करून पाठवून देऊ शकता.
सध्याला कोल्हापूर सांगली भागात जायचे रस्ते जवळपास बंद असल्यामुळे 3 दिवसात कलेक्शन करून रविवारी किंवा सोमवारी तुम्ही ती मदत तिकडे रवाना करू शकता.
कशी कराल मदत
१) जीवनावश्यक वस्तू
2) धान्य,साखर,तांदूळ, गहू,चहापावडर,चटनी,मीठ, डाळी,साबण, टूथ पेस्ट
3) गरम कपडे, महिला आणि लहान मुलांचे कपडे
5) खाद्यपदार्थ
4) टॉवल चादरी आणि इतर जीवनावश्यक गोष्टी
5) दैनंदीन वापरात लागणाऱ्या गोष्टी आपण मदत म्हणून देऊ शकत
6) साथीच्या रोगावर उपायकारक औषधे
7) फेसमास्क,हैंडग्लोज
8) फिनाइल आणि सफाई साठी आवश्यक साहीत्य
पुण्यात वस्तू देण्यासाठी पत्ता- द सावली अभ्यासिका, नवीन मराठी शाळेजवळ, शिंदे पार चौक, शनिवार पेठ पुणे, ४११०३०
मदत करण्यासाठी खालील क्रमांकावर साधू शकता संपर्क-
9422026475- शंभूराजे ढवळे, 9765359593- हर्षवर्धन मगदूम, 9960072727- प्रदीप बेलदरे, 9764632119- प्रदीप कणसे, 9096207033- अनिल माने, 8793870712- ब्रम्हा चट्टे, 9975706904- पूजा झोळे, 7757837777- प्रशांत भोसले, 7276525252- विश्वास काशीद, 9850690415- विनय पाटील, 9922465462- रोहित जाधव
संपूर्ण महाराष्ट्रात मदत संकलन चालू आहे. तुम्ही तुमच्या शहरात मदत जमा करून ती पाठवून देऊ शकता.
चला आपल्या माणसासाठी माणूस म्हणून या संकटसमयी त्यांच्या सोबत उभा राहू