माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. त्यांच्यावर दिल्लीतील लोधी स्मशानभूमीतील विद्युत शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी यांनी त्यांचा अंत्यविधी केला. यावेळी स्वराज यांच्या कुटुंबीयांसह उपस्थितांना आपल्या भावनांना आवर घालता आला नाही.
यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आदी उपस्थित होते.
सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला केंद्रिय परराष्ट्रमंत्री राजनाथ सिंह, मंत्री रवीशंकर प्रसाद, मंत्री पियुष गोयल आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी खांदा दिला.
त्यांना काल संध्याकाळी त्रास होऊ लागल्याने एम्स मध्ये भरती करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिन्यांपासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या.
त्यांचे पार्थिव आज अंतिम दर्शनासाठी दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात ठेवण्यात आले होते. त्यावेळी अंत्यदर्शनासाठी सर्वांनी मोठी गर्दी केली होती. भाजपच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती.
मागील वर्षी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतरच त्या राजकारणापासून दूर झाल्या होत्या. त्यांनी लोकसभेची निवडणूक देखील लढवली नव्हती.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.