देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. त्यांची कारकीर्द धडाकेबाज होती. त्याचप्रमाणे त्यांची प्रेमकहाणी देखील तितकीच रंजक होती.
केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचा जन्मदिवस १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी असतो. मध्य प्रदेशातील विदिशाच्या खासदार असलेल्या सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरियाणामधील अंबाला येथे झाला. सुषमा स्वराज या भारत सरकार मधील महत्वाच्या मंत्री होत्या. सुषमा स्वराज यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालयासारखं मोठं महत्वाचं खातं होतं.
सुषमा स्वराज यांनी २००९ मध्ये संसदेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका देखील बजावली आहे. सुषमा स्वराज यांच्या राजकीय जीवनाविषयी अनेकांना माहिती आहे. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी जन्मलेल्या सुषमा स्वराज यांनी लव्ह मॅरेज केलेलं आहे.
देशातील सर्वात युवा ऍडव्होकेट जनरल-
सुषमा स्वराज यांच्या पतीचे नाव स्वराज कौशल आहे. दोघांची ओळख कॉलेजमध्ये असताना झालेली. भाजपच्या लोकप्रिय नेत्या असलेल्या सुषमा स्वराज यांनी १३ जुलै १९७५ ला लग्न केले. त्यांचे पती सुप्रीम कोर्टाचे सुप्रसिद्ध वकील आहेत. त्यांना वयाच्या ३४ व्या वर्षीच देशातील सर्वात युवा ऍडव्होकेट जनरल बनण्याचा गौरव मिळाला होता. एवढेच नाही तर ते वयाच्या ३७ व्या वर्षीच मिझोरामचे राज्यपाल(१९९०-१९९३) देखील बनले होते.
कॉलेजमध्ये सुरु झाली प्रेमकहाणी-
बोलले जाते कि सुषमा स्वराज आणि स्वराज कौशल यांची लव्हस्टोरी कॉलेजपासूनच सुरु झाली. दोघंही वकिलीचे शिक्षण घेत असताना एकमेकांना भेटले. त्या स्वतः देखील सुप्रीम कोर्टाच्या वकील राहिल्या आहेत. हि भेट झाली पंजाब युनिव्हर्सिटीच्या चंदीगड लॉ डिपार्टमेंट मध्ये. इथेच दोघांना प्रेम झाले आणि पूढे त्यांनी लग्न केले. पण इतरांप्रमाणे त्यांची प्रेमकहाणी देखील सरळ सोपी नव्हती.
घरच्यांनी केला होता लग्नाला विरोध-
लग्नासाठी दोघांना खूप प्रयत्न करावे लागले. दोघांचेही कुटुंबीय या लग्नासाठी राजी नव्हते. त्यांनी घरच्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी प्रेमविवाह केला तेव्हा हरियाणामधील मुलगी प्रेमविवाह तर दूरच पण साधं प्रेम देखील करू शकत नव्हती. २५ व्या वर्षी त्यांनी हिंमत दाखवली आणि प्रेमविवाह केला.
सुषमा स्वराज यांनी शाळेत असताना एनसीसी मध्ये देखील काम केलेले आहे. सुषमा स्वराज यांना एक मुलगी आहे. बासुरी हि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएट असून ती सुद्धा वकिली करते. सुषमा स्वराज यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या पती स्वराज यांनी थँक यु म्हणले होते. स्वराज कौशल हे देखील हरियाणामधून राज्यसभेचे खासदार राहीले आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.