सुषमा स्वराज म्हणजेच पूर्वाश्रमीच्या चिंकू शर्मा यांचे ६ ऑगस्टच्या रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. कुणालाही अपेक्षित नसताना त्यांचे अचानक निघून जाणे ही मनाला चटका लावून जाणारी घटना आहे.
अमेरिकेतील “वॉल स्ट्रीट जर्नल”ने भारताच्या आवडत्या राजकारणी म्हणून त्यांची घेतलेली दखल भारताच्या राजकारणात सुषमा स्वराज यांची असणारी उंची सांगण्यासाठी पुरेसे आहे. भारतीय जनता पक्ष जनमानसांत घेऊन जाण्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष दखलपात्र आहे.
सुषमा स्वराज यांनी ही पदे भूषवली आहेत
भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या वकील म्हणून आपली कारकीर्द सुरु करणाऱ्या सुषमा स्वराज १९७७ मध्येच वयाच्या २५ व्या वर्षी हरियाणात कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. त्यांनी भारतीय जनता पक्षाला महत्वाचे यश मिळवून देत १९९८ मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून काम केले. सुषमा स्वराज भारतीय संसदेच्या सदस्य म्हणून ७ वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून ३ वेळा प्रतिनिधित्व केले आहे.
अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री, दूरसंचारमंत्री, आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री या पदांवर काम केले. २००९ ते २०१४ या काळात लोकसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणून त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणून २०१४ मध्ये भाजपची सत्ता केंद्रात आली. मोदी सरकारमध्ये त्या परराष्ट्र व्यवहार मंत्री बनल्या. इंदिरा गांधींनंतर हे पद घेणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या.
आपल्या शेवटच्या ट्विटमधून सुषमा स्वराजांनी व्यक्त केल्या या भावना
सुषमा स्वराज यांचा मृत्यू होण्यापूर्वी ट्विटरवर त्यांचे एक ट्विट आले होते : “प्रधान मंत्री जी – आपका हार्दिक अभिनंदन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी.” थोडक्यात नुकतेच काश्मीरमधून जे ३७० कलम हटवण्यात आले त्याबद्दल त्या सांगत आहेत. कलम ३७० हा मुद्दा भाजपच्या कायम अजेंड्यावर असायचा.
प्रधान मंत्री जी – आपका हार्दिक अभिनन्दन. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी. @narendramodi ji – Thank you Prime Minister. Thank you very much. I was waiting to see this day in my lifetime.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) August 6, 2019
भाजपच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज हा मुद्दा घेऊन लोकांत गेल्या होत्या. साहजिकच हे कलम हटवणे भाजपच्या प्रत्येक नेत्याचे स्वप्न होते, ते पूर्ण झाल्याने सुषमा स्वराजही आनंदीत होत्या. नियतीने भाजपाला कलम ३७० हटवल्याचा आनंद दिला, वाघिणीसारख्या सुषमा स्वराज यांच्या जाण्याचे दुःखही दिले. सुषमा स्वराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.