युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी प्रत्येक भारतीय व्यक्तीस एक विशेष क्रमांक दिला आहे. त्या क्रमांकाला आधार क्रमांक म्हणतात. हा आधार व्यक्तीच्या बोटांचे आणि डोळ्यांचे ठसे याला जोडलेला असल्याने एका क्रमांकाची नक्कल दुसऱ्याला करता येत नाही.
तसेच व्यक्तीची जन्मतारीख, पत्ता, फोटो, लिंग इत्यादि जनसांख्यिक माहितीही यात समाविष्ट केली जाते. या जनसांख्यिक आणि जैवसांख्यिक माहितीच्या आधारे व्यक्तीचे आधार कार्ड बनवले जाते.
आधार कार्डचे महत्व
आजच्या काळात कुठलेही सारकारी काम असो, नोकरी, प्रवेश, कर्ज, शासकीय सवलतींचा लाभ, सबसिडी, ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, इत्यादि वेगवगेळ्या ठिकाणी आधार कार्ड हा महत्वाचा पुरावा मानला जातो. आधार म्हणजे खरोखरच व्यक्तीला तिची ओळख निदर्शित करणारा पाया आहे.
पण हे आधार कार्डच हरवले तर ? काळजी करु नका. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी आधार कार्ड हरवल्यास ते रि-प्रिंट करण्याची सुविधाही उपलब्ध केली आहे.
आधार कार्ड रि-प्रिंट करण्यासाठी हे करा
१) सर्वात आधी युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या www. uidai. com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. २) त्यांच्या होम पेजवरच्या Get Aadhaar टॅबमधील Order Aadhaar Reprint या पर्यायावर क्लिक करा.
३) तिथे तुमचा आधार क्रमांक आणि समोरच्या बॉक्समध्ये दिलेला कॅप्चा सुरक्षा कोड टाका. ४) तुमच्याकडे जर रजिस्टर केलेला मोबाईल नंबर नसेल तर My Mobile number is not registered यासमोरच्या बॉक्समध्ये टिक मार्क करून Send OTP बटनावर क्लीक करा.
५) तुमच्या मोबाईलवर एक वन टाइम पासवर्ड (OTP) येईल. तो OTP डावीकडे असंलेल्या OTP बॉक्समध्ये टाकावा. ६) त्यानंतर Make Payment या टॅबवर क्लीक करावे. ७) तुम्ही हे पेमेंट डेबिटकार्ड / क्रेडिटकार्ड, नेटबँकिंग किंवा UPI द्वारेही भरू शकता.
८) तुमचे पेमेंट यशस्वी झाल्यानंतर तुम्हाला एक डिजिटल सही असणारी पावती मिळेल. ती पावती तुम्ही PDF स्वरूपातही डाउनलोड करु शकता. ही प्रक्रिया केल्यांनतर तुमचे आधारकार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर पाठवले जाईल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.